अंमलबजावणीकडे दुर्लक्ष११६ जणांविरोधात कार्यवाही, ५ कोटींचा दंड परंतु अद्याप ही वसुली नाही

उमरखेडमध्ये अनधिकृत ले-आऊट, प्लॉट विक्रीचा गोरखधंदा जोरात
मुख्य संपादक मो.9021233696
उमरखेड शहरालगत मागील चार ते पाच वर्षांपासून विनापरवाना ले-आऊट करत प्लॉट विक्रीच्या गोरखधंद्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या संदर्भातील तक्रार सन २०२० पासून करण्यात आली असता आतापर्यंत ले-आऊट निर्माण करणाऱ्यांना ५ कोटी रुपयाच्या जवळपास दंड ठोठावण्यात आला आहे. नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्याने आतापर्यंत २८ जणांविरोधात फौजदारी कार्यवाही केली मात्र आतापर्यंत दंडही भरण्यात आला नाही अन् पोलिस कार्यवाही सुद्धा थंडबस्त्यात असल्याने आजही हा व्यवसाय बिनदिक्कतपणे शहरात सुरु आहे.

आजपर्यंत शहरालगत जवळपास २५ ते ३० ले-आउट निर्माण झाले आहे मात्र एकही ले-आऊट हे एनए(अकृषक)झालेले नसून देखील ले-आऊटमधील प्लॉटची विक्री सुरू आहे. अशा ले-आऊट धारका विरोधात सामाजिक कार्यकर्ते शेख. इरफान शेख. ईसा यांनी तक्रार केल्यानंतर जवळपास पाच कोटी रुपयांचा दंड वीस ले-आऊट धारकांना तहसीलदारांमार्फत ठोठावण्यात आला मात्र अद्याप
एकही ले-आऊट धारकांनी दंड भरला नसल्याचे समोर आले आहे. तर फौजदारी झालेल्या एकाही जणांविरोधात पोलिसांनी ठोस कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.
एखाद्या ले-आउटची निर्मिती करीत असताना नगरपरिषद, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, नगररचना, एमएसईबी, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासह १२ कार्यालयाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असताना
एकाही ले-आऊट धारकांनी कोणत्याही कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना देखील खुल्या ले-आऊटमध्ये प्लॉट पाडुन, नोटरी करून प्लॉट विकण्याचा नवीन फंडा सुरू आहे. सन २०२० ला तक्रार झाल्यानंतर तीच तक्रारी पुन्हा ३ वर्षात जवळपास ५० वेळा शेख. इरफान यांनी केली. तसेच २०२० मध्ये पुसद न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दंड झाला असतानाही देखील आतापर्यंत कुणीही दंड भरला नाही, ज्यांना दंड

झाला नाही पुन्हा त्यांना दंड आकारण्यात यावा अशी मागणी दि. २९/ ११ /२०२४ शेख. इरफान यांनी तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे . तहसीलदार यांनी खंड १ व २ मधील शेत गट क्रमांक ६१/२ शिवाजी वार्डचे गट क्रमांक ५७ /१ जामा मस्जिदच्या मागे, शेत गट क्रमांक ९० नांदेड रोड, शेत गट क्रमांक ६१/१ शिवाजी वार्ड, शेत गट क्रमांक ८९ / १ ब नांदेड रोड, शेत गट क्रमांक ९० नांदेड रोड, शेत गट क्रमांक ९० शेत गट क्रमांक ८९/ १ / अ कुरेशी फंक्शन हॉलच्या मागे, गट क्रमांक ९१/२ नांदेडरोड, शेत गट क्रमांक ९१/२ ब मागे नांदेड रोड तसेच खंड २ मधील शेत गट क्रमांक १८८ / १ ताजपुरा कब्रस्तानसमोर नांदेडरोड, शेत गट क्रमांक १७८ नांदेडरोड, शेत गट क्रमांक १६९/४ बिटरगाव रस्त्यावरील वेअर हाऊसजवळ, शेत गट क्रमांक १८०/४ नांदेडरोड, शेत गट क्रमांक १७९/३ व १७९/१ नांदेड रोड कॅनलजवळ, शेत गट क्रमांक १८०/ ४ नांदेड रोड शेत गट क्रमांक १८८/१ नांदेड रोड उमरखेड शेत गट क्रमांक ८९/१/ अ नांदेड रोड उमरखेड शेत गट क्रमांक ९१/२/ अ नांदेड रोड उमरखेड शेत गट क्रमांक १८०/४ नांदेड रोड उमरखेड शेत गट क्रमांक १७८ नांदेड रोड उमरखेड शेत गट क्रमांक १७८ नांदेड रोड उमरखेड शेत गट क्रमांक १७८ नांदेड रोड उमरखेड या सर्व अनधिकृत धारकांना तत्कालीन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी पाच कोटींच्या जवळपास दंड ठोठावला आहे. तरी दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी किंवा सदरील गटांचे सातबारावर बोजा चढवावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.