80 वर्षापासून होमगार्ड संघटनेचे प्रश्न अधांतरी होमगार्ड सैनिकांना बारा महिने कर्तव्यावर घ्या : होमगार्ड सैनिकांचे निवेदन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
शासनाने आजपर्यंत होमगार्ड सैनिकांचा आपल्या कामा पुरताच वापर केला आहे यामधून होमगार्ड सैनिकांच्या कुटुंबाचा उदर निर्वाहाचा प्रश्न कायमस्वरूपी उपस्थित झाला असून होमगार्ड सैनिकांना बाराही महिने कर्तव्यावर बोलवा अशा आशयाचे निवेदन होमगार्ड सैनिकांनी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी होमगार्ड संघटना ही स्वयंसेवी संघटना म्हणून उदयास आणून होमगार्ड ची निर्मिती केली. तेव्हापासून आजपर्यंत होमगार्ड सैनिकांनी शासनाने वेळोवेळी शासनाच्या परिपत्रकानुसार सुधारणा करून देखील कर्तव्यावर हजर राहत होते. परंतु शासनाने आपल्या पोलीस प्रशासनाच्या वाढणाऱ्या तानाच्या मोबदल्यात होमगार्ड सैनिकांना महाराष्ट्र शासनाच्या वापरापुरतेच होमगार्ड सैनिकांना कामावर बोलावून त्यांचा वापर करून घेतला. शासनाने होमगार्ड सैनिकांचा आणि कुटुंबाचा उदर पोषणाचा कधीही विचार केला नाही. 1946 पासून अस्तित्वात असलेले ही संघटना आजपर्यंत कायमस्वरूपी करण्यास शासनाने पुढाकार घेतला नाही त्यामुळे होमगार्ड सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदर पोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास 80 वर्षापासून कार्यरत असलेल्या संघटनेच्या सदस्यांच्या शासनाने विचार केला नाही. खरे पाहिले तर होमगार्ड सैनिक हे सर्व संघटनेकडून मिळणाऱ्या मानधनावरच आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पण अनेक दिवस हाताला कामच मिळत नसल्यामुळे होमगार्ड सैनिक हताश होत आहेत. त्यांचा विचार करून मंत्री महोदयांनी सभागृहात आवाज उठवावा व होमगार्ड सैनिकांना बाराही महिने कर्तव्यावर बोलवावे अशा आशयाचे निवेदन होमगार्ड सैनिकांनी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना दिले आहे.
सदर निवेदनावर टी. बी. आठवले, समीर खा, मनीष राठोड, अमोल आडे, बी. एम. सिंगनकर, विजय आठवले यांच्यासह अनेक होमगार्ड सैनिकांनी निवेदनावर सह्या केलेले आहेत.



