Uncategorized

पूस नदीपात्र कोरडे ठणठणीत; पाणी सोडण्याची मागणी तीव्र दहा किलोमीटरवर वेणी धरण असताना महागाव तालुका पाण्यासाठी तहानलेला


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील पूस नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने ग्रामपंचायत पाणीपुरवठा, जनावरांचे पिण्याचे पाणी आणि शेती सिंचन या तिन्ही बाबींवर गंभीर संकट ओढवले आहे. त्यामुळे पूस नदीत तातडीने पाणी सोडावे, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
मोरथ, वाकोडी, उटी, सवना, कलगाव, महागाव, जुनना, कंजरखेड, वाघनाथ, हिवरा, थार, धनोडा आदी गावांतील नागरिकांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणात पूस नदीवर अवलंबून आहे. मात्र नदीपात्र कोरडे पडल्याने जनावरांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढून तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ऊसासह विविध पिकांच्या सिंचनावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भूजलपातळी घटल्याने विहिरी व बोअरवेलची पाणीपातळीही कमी झाली आहे. नदीत पाणी सोडल्यास भूजलपातळी वाढून ग्रामीण भागाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी तातडीने हस्तक्षेप करून पूस नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत चौधरी, अतुल शिंदे, सुनील भरवाडे, बाळू नरवाडे व ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button