शहर

उमरखेड दिवाणी न्यायालय व. स्तर या इमारतीमध्ये जिल्हा न्यायालय उमरखेड चालू करा ॲड.संजीवकुमार जाधव

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे दिवाणी न्यायालय व. स्तर व जिल्हा न्यायालय १ यांचे न्यायालय सन २०१९ मध्ये मंजुर झाले आहे. त्या प्रमाणे सन २०२२ मध्ये दिवाणी न्यायाधीश व. स्तर चालु करण्याची परवानगी मिळाली. प्रत्यक्षात सन २०२३ मध्ये दिवाणी न्यायालय थ. स्तर चे उद्‌घाटन झाले.

उमरखेड येथील न्यायालयात न्यायालयीन इमारतीमध्ये त्याच वेळी जिल्हा न्यायाधीश साहेबांचे न्यायालय सुरु करण्याच्या दृष्टीने वकील संघ कक्ष क्रं. २ ची पाहणी करण्यात आली वकील कक्ष क्रं. २ चा हॉल सुद्धा दिवाणी न्यायालय व. स्तर चालु असलेल्या हॉल एवढाच आहे. त्या हॉलचे उत्तर बाजुने न्यायाधीश साहेबांचे चेंबर करण्यासाठी जागा आहे त्याचे मोजमाप देखील त्यावेळी झालेले आहे. याशिवाय सदर कक्षाच्या पूर्व बाजुने नझारत कक्षाकरीता जागा आहे. मोटरसायकल स्टॅन्डचे सुद्धा भिंती बांधल्यास कारकुन यांना बसण्याकरीता जागा होवु शकते. नवीन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत या ठिकाणी न्यायालय सुरु होऊ शकते. पार्कीगकरीता मुबलक जागा आहे.

उमरखेड या ठिकाणावरुन पुसद ४५ किमी अंतरावर आहे. उमरखेड न्यायालयाचे कार्यक्षेत्र पुसद पासुन १२५ किमी अंतरावर आहे. सध्या महामार्गाचे काम सर्वत्र चालु आहे. उमरखेड पुसद या रस्त्यावर रेल्वेच्या कामाचे वाहतुकीमुळे दोन वर्षापासुन रस्ता अतिशय खराब झालेला आहे. अजुने ३-४ वर्षे रेल्वेमार्गाचे काम चालणार आहे. त्यानंतर उमरखेड पुसद अकोला या महामार्गाचे सिमेंट
रोडचे काम होणार आहे. त्यामूळे अजुन ५-६ वर्षे खराब रस्त्याने जावुन पक्षकार यांना न्याय मागणे अतिशय कठीण झाले आहे. त्या रस्त्यावर दररोज अपघात व खराब रस्त्यामूळे वाहनाचे बिघाड वाढले आहेत.

उमरखेड या ठिकाणी जिल्हा न्यायालय मंजुर झाल्यामुळे उमरखेड येथील वकील लोकांचा जिल्हा न्यायालयातील प्रकरणात सहभाग वाढला आहे. त्यमुळे वकीलांना सुद्धा उमरखेड पुसद जाणेयेणे त्रासाचे होत आहे. खराब रस्त्याने जावुन न्यायालयीन कामकाज करणे कठीण झाले आहे. याशिवाय उमरखेड तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना साक्ष देणे, समंस बजावणे याकरीता जाणेयेणेकरावे लागते. खराब रस्त्यामूळे न्यायप्रक्रियेच्या कामावर ताण पडत आहे. वकीलांवर सुद्धा शारिरीक, मानसिक ताण पडत आहे. त्यामूळे उमरखेड न्यायालयात उपलब्ध असलेल्या जागेमध्ये जिल्हा न्यायाधीश साहेब १ यांचे न्यायालय चालु झाल्यास पक्षकार व वकील यांना न्यायप्रक्रियेत सहभाग नोंदविणे सोयीचे होईल. त्यामुळे दिवाणी न्यायालय व. स्तर या इमारतीत उपलब्ध असलेल्या जागेवर जिल्हा न्यायालय १ सुरु करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button