देशात महिलांचा सर्वोच्च सन्मान; पण हिमायतनगर SBI मध्ये केवायसीसाठी छळ: जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी, एकाच काउंटरमुळे पिण्याच्या पाण्याविना ५ तास ताटकळणाऱ्या महिलांना भोवळ!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
जनतेच्याच कष्टाच्या पैशांवर आणि करांतून गलेलठ्ठ पगार घेणारे बँक कर्मचारी आज सामान्य नागरिकांनाच वेठीस धरत असल्याचा संतापजनक प्रकार हिमायतनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत समोर आला आहे.
केवायसी (KYC) न झाल्यामुळे खाते फ्रीज होणे, शासकीय योजनांचे अनुदान, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी आणि निवृत्तीवेतन ब्लॉक होणे यासह दैनंदिन व्यवहार बंद पडण्याच्या भीतीने नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. महिलांना आपली घरची कामे, लहान मुलांचे संगोपन व इतर अत्यावश्यक गरजा बाजूला सारून केवायसी करण्यासाठी बँकेत यावे लागत आहे. आरबीआय (RBI) व बँकेच्या स्पष्ट नियमांनुसार महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग, पिण्याच्या पाण्याची सोय आणि लोकसंख्येनुसार पुरेसे केवायसी काउंटर्स उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
मात्र, हिमायतनगर शाखेच्या व्यवस्थापनाने सर्व नियम धाब्यावर बसवत संपूर्ण तालुक्याचा भार अवघ्या एकाच काउंटरवर ढकलून दिला आहे. त्यातच बँकेत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने उकाड्यात आणि अतोनात गर्दीत ५-५ तास ताटकळत उभ्या राहणाऱ्या महिलांना भोवळ येत आहे. बँकेच्या या मनमानी कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, तात्काळ अतिरिक्त केवायसी काउंटर्स सुरू करून पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास संतप्त ग्रामस्थांच्या वतीने एसबीआय शाखेला टाळे ठोकून तीव्र घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



