शहर

अठरापगड जाती धर्मातील तमाम बहुजनांना एकत्र करून सामाजिक प्रबोधनाचा माध्यमातून जागृती घडविणाऱ्या अशाच प्रबोधन कार्यक्रमांची आज समाजाला नितांत गरज आहे.”

सहसंपादक शेख मुजाहिद


असे प्रतिपादन उमरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्रीताई जैन यांनी केले.
त्या प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट तथा जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक गीत गायन व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात राजे संभाजी नगर बोरबन उमरखेड येथे बोलत होत्या.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवनियुक्त विक्रीकर आयुक्त ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी उपस्थित युवकाना ,”महापुरुषांच्या विचारांचा अंगिकार करून विविध क्षेत्रात यश संपादित करून आचरण केले पाहिजे.” असे विचार व्यक्त केले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या सरोजताई देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक गजेंद्र ठाकरे,बांधकाम सभापती न . पा.उमरखेड प्रकाश शिकारे, आरोग्य सभापती न . पा.उमरखेड विरेंद्र खंदारे,सामाजिक कार्यकर्ते राहुल काळबांडे,मराठा सेवा संघाचे प्रवीण सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आठवले,सुभाष वाठोरे, प्रकाश हापसे, देवानंदपाटील मोरे,प्रफुल दिवेकर,आकाश लोणकर,सुनीताताई वाळके, हरीभाऊ जाधव,पत्रकार सविताताई चंद्रे,मुनव्वर पठाण,प्रमोद वाळुककर, सतेजभाऊ जैन,हरिभाऊ जाधव,राम कांबळे,बंडू भुते आदी उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ज्यामध्ये अक्षय कांबळे, विद्यारत्न खंदारे, डॉ.नितु मुनेश्वर, भुषण पठाडे, अवंती लोकरे, प्रसेनजीत पाटील,अंजली पवार, सौरभ पाईकराव,सूरज बहादूरे,यश फटाले,आदित्य वाळूककर, तेजस पाटील,रोहन खर्चे, आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर शिवरंजन म्युझिकल ग्रुप चे गायक शिवशंकर वैद्य आणि संच यांनी प्रबोधनात्मक गीत गायनाचे सादरीकरण करून श्रोत्यांची माने जिंकली.
प्रस्तावना निखिल थोरात,संचलन प्रशिक नंदुरकर,तर आभार आम्रपाली प्रदीप लोकरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट, जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ,भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.अठरापगड जाती धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी ट्रस्ट चे अध्यक्ष विद्वान केवटे,कोषाध्यक्ष संभाजी पाईकराव यांसह मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button