शहर

उमरखेड शहरालगतच्या हायप्रोफाईल जुगार अड्यावर धाड

उमरखेड : यवतमाळ

स्थानिक गुन्हे शाखेने उमरखेड शहरालगत येत असलेल्या बेलखेड पांदन रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या एका हायप्रोफाइल जुगार अड्डयावर धाड टाकून मोठी कारवाई केली ही कारवाई शुक्रवार १७ एप्रील रोजी सायंकाळच्या दरम्याण स्थानीक गुन्हे शाखेच्या वतीने पार पाडण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे ८ लाख ४० हजार रुपये रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त केला असून, यात १० मोबाईल १० मोटार सायकल असा एकूण १५ लाखाचे वर मुद्देमाल जप्त करुण १६ जुगाऱ्याना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे उमरखेडमधील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. नितेश कृष्णा राठोड रा. दत्तबर्डी, गनबा किसन चिकणे रा. फुलसावंगी टिकाराम उमाजी चव्हाण रा. दत्तबर्डी, सुरज योगेंद्र गुप्ता (३८), रा. बादली, सैययद रसुल सैययद मुसा रा. रोहीले पुरा उमरखेड, संतोष सुर्यभान जोगदंड रा. चिचगव्हाण, मनोहर दत्तराव जाधव रा. कोळी, सैययद सोहेल सैययद अली रा. पिवरठा, सैययद पाशु सैययद रहेमुद्यीन रा. देगलूर फाटा नांदेड शिवाजी केशवराव कदम रा. बैसा ता. वैसा जि. नांदेड, अशोक नारायण शिंदेरा. मिरकस वाडी जि. नांदेड, शेख शहबाज शेख रफिक जि. नांदेड शेख रमजान शेख फरिद उमरखेड, शेख बदशाह शेख हुसेन रा. राणी धानोरा, नारायण भिमराव चव्हाण रा. नांदेड शरद भारत राठोड रा. ढाणकी. यवतमाळ यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतिश चवरे यांच्या नेतृत्वात, ए. पी. आय पवन राठोड, एपीआय धीरज बंडे, पीएसआय राजमल्लु, पी एस.आय. शरद लोहकरे, ठाणेदार शंकरराव पांचाळ, योगेश जाधव, पीएसआय जांभळे व दोन अंमलदार यासह एलसीबी पथकाने ही कारवाई पार पाडली.

तब्बल आठ लाख रुपयांच्या वर रोकड जप्त
सोळा जुगाऱ्याना पोलीसानी घेतले ताब्यात
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button