Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

संविधान निर्मात्याचा अपमान सहन करणार नाही; आरोपी विकास गुलेवाडवर हिमायतनगर पोलिसांत गुन्हा दाखल!
हिमायतनगर


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


(हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
संपूर्ण जगाला ज्ञान आणि देशाला अखंड संविधान देणारे युगपुरुष भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर अत्यंत अश्लील व गलिच्छ कमेंट करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या आरोपीवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात कडक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देश घडवणाऱ्या आणि सर्वांना समान हक्क देणाऱ्या अशा महामानवावर विकृत भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही; अशा कृत्य करणाऱ्यांविरुद्ध समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विकास गुलेवाड (रा. सिरंजनी, ता. हिमायतनगर) याने सोशल मीडियावर धार्मिक व सामाजिक भावना दुखावणारी कमेंट केली होती. याप्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांनी २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २०:४७ वाजता आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ आणि ३५३(२) अंतर्गत गुन्हा नोंद (गु.र.नं. २९६) केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी (मा. पो. नि. रणखांब साहेब) यांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक (मा. स. पो. नि.) माने साहेब या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button