ओबीसी जनगणने साठी समर्पित राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास ढानकी शहरातून हैदराबाद येथे शेकडो बांधव सहभागी.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी हैदराबाद, तेलंगणा येथील सुंदरय्या विज्ञान केंद्रम ट्रस्ट, बाग लिंगमपल्ली येथे पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मा. वामन मेश्राम साहब, राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ,नवी दिल्ली यांनी भूषवले यावेळी, त्यांनी”भारतीय मूलनिवासी मुसलमानांनी शासक वर्गाची प्रतिक्रियेची राजनीती ओळखून संविधानिक भूमिका घेऊन एससी, एसटी,ओबीसी यांच्यासोबत एकता स्थापन करून आपले हक्क अधिकाराची लढाई काढली पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
तर उद्घाटक म्हणून हजरत मौलाना डॉ. सईद अहमद उमरी मदनी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रभारी जनाब चांद मोहम्मद होते.
या अधिवेशनाला देशभरातून प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून ओबीसी मोर्चाचे राष्ट्रिय अध्यक्ष चौधरी विकास पटेल, एम. डब्ल्यू. अंसारी (रिटायर्ड IPS व माजी DGP मध्यप्रदेश), प्रोफेसर मुफ्ती जाहिद खान, हजरत सैयद नादे अली,एड. आदिल अहमद (सुप्रीम कोर्ट अधिवक्ता), मा. कुलदीप सिंह राठौर(क्षत्रिय मूलनिवासी महासंघ), तर विशेष अतिथी म्हणून जनाब रियाज देशमुख (रिटायर्ड IPS), मा. दासराम नायक, मुफ्ती नौशाद अख्तर नदवी, मा. टी. चिरंजीवी, इंजी. अजहर उल हक, डॉ. अलीम खान फालकी, प्रोफेसर दीपक वासनिक आणि सरदार हरविंदर सिंह खालसा (राष्ट्रिय सीख मोर्चा)आदी उपस्थित होते.
प्रथम सत्र सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत झाले, ज्यामध्ये तीन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पहिला विषय होता की संसद आणि न्यायपालिकेने हे विसरू नये की त्यांचा जन्मदाता संविधान आहे आणि संविधानाचे निर्माते आम्ही भारताचे लोक आहोत. दुसरा विषय भारतातील मुस्लिमांवर धार्मिक आधारावर होणारे हिंसक हल्ले, मॉब लिंचिंग, व खोट्या आरोपांच्या नावावर निष्पाप लोकांच्या होणाऱ्या हत्यांमागे मनुवादी विचारधारा कार्यरत आहे यावर गंभीर चर्चा झाली. तिसरा विषय भारतीय मुस्लिमांमध्ये संविधानाबद्दल असलेले अज्ञान हेच त्यांच्या बर्बादीचे मुख्य कारण आहे यावर मंथन करण्यात आले.
यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आज देशात शासक जातींकडून निष्पाप मुसलमानांना खोट्या आरोपांच्या नावाखाली मॉब लिंचिंग करून मारले जात आहे. केवळ मुसलमान असल्याच्या संशयावरून तुरुंगात टाकले जात आहे, तसेच अजान, नमाज आणि हिजाबवरून वाद निर्माण करून संसदेत संविधानाच्या विरोधात कायदे बनवून मुस्लिम समाजाला बदनाम केले जात आहे. मशिदींवर हमले करणे आणि वक्फच्या संपत्तीवर बेकायदेशीर मार्गाने कब्जा करण्याच्या मागेही मनुवादी विचारधारा आहे. यासोबतच मुस्लिम समाजात कोण जालिम आहे आणि कोण मजलूम आहे याची जाणीव नसल्याने एक जालिम शासक जाऊन दुसरा जालिम शासक बनत आहे. मुसलमान सतत अशा समस्यांना बळी पडत असून यामागे संविधानाबद्दलचे अज्ञान आणि मित्र-शत्रूची ओळख नसणे ही मोठी समस्या आहे. यावर खुली चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे भारतातील ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ह्या मुद्यासाठी ओबीसी बांधवांच्या समर्थनात हे आंदोलन समर्पित करण्यात आले होते.
ह्या अधिवेशनात उमरखेड तसेच ढानकी शहरातून राष्ट्रिय मुस्लिम मोर्चा चे शेख जब्बार भाई, मुजाहिदखान, सैय्यद अमिनभाई यांच्या नेतृत्वात व इंजि.विद्वान केवटे यांच्या मार्गदर्शनात शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधवांसह एससी, एसटी, ओबीसी,मराठा बांधव देखील सहभागी झाले होते.ह्या अधिवेशनात संविधानिक जागृती करण्यात आली.
अठरापगड जाती धर्मातील मूलनिवासी बहुजन बांधवांनी ह्या सामाजिक जागृती कार्यक्रमात सहभाग घेऊन धार्मिक व जातीय सलोख्याचा एकतेचा संदेश दिला.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



