शहर

संवैधानिक पद नसताना पोलीस संरक्षणात प्रचार? — शिवसेनेची तक्रारमहागाव प्रतिनिधी संजय नागरगोजेभाजपा उमेदवाराविरुद्ध शिवसेनेची निवेदनुक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार; अँड संजय जाधव यांची माहिती

उमरखेड — नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारास अधिकृत संवैधानिक पद नसतानाही पोलीस संरक्षण देण्यात आले व त्याचा वापर करून खुलेआम प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शिवसेना नेता अँड. संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेत तक्रार नोंदवत सांगितले की, “नियमावलीत कोणत्याही साध्या कार्यकर्त्यास पोलीस संरक्षण देण्याची तरतूद नाही. संरक्षणाचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी होत आहे. हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे.”

त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार देत तात्काळ तपासणी करून कारवाईची मागणी केली.

शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले की, उमेदवाराच्या प्रचारफेऱ्या, गावभेटी, कार्यकर्त्यांशी बैठक यामध्ये पोलीस कर्मचारी तुकडी तैनात दिसत आहे. “यामुळे इतर उमेदवारांमध्ये असंतोष असून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष राहणार नाही,” असा दावा करण्यात आला.

तक्रारीत संरक्षण मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणत्या आदेशानुसार, कोणत्या धोका अहवालानुसार हे संरक्षण दिले याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button