Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

लाज वाटायला पाहिजे मंत्री महोदय व आमदार खासदार काजू बदाम पिस्ते खायला शेतकऱ्याच्या अवस्थेकडे बघा


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



दिनेश पाटील रावते सावळेश्वर यांचा नांदेड दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यावर घनघाती प्रहार

राज्यातील मंत्र्याचा नांदेड दौरा हा केवळ दिखावा ठरला असून शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे शासन आणि मंत्री महोदयाचे लक्षच नाही अशी तीव्र टीका दिनेश पाटील रावते सावळेश्वर कर यांनी केली आहे मंत्री महोदय काजू बदाम पिस्ते खायला लाज वाटायला पाहिजे कारण शेतकरी आजही उपाशी आहेत कर्जबाजारी आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे असे रोखठोक विधान नांदेड दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यावर केली दिनेश रावते म्हणाले की आज शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे बियाणे खते औषधे मजुरी या सर्वच खर्च आसमानाला वाढला आहे पिकांची उत्पादन घेणे अवघड झाले असून बाजार भाव ही शेतकऱ्यांच्या हाताला नाही नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अतिवृष्टी मोठे नुकसान होत आहे
आज शेतकऱ्यांची पिक उगवणे हे मोठे आव्हान बनले आहे हवामानातील बदल अवकाळी पाऊस गारपीट व न पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे यासाठी पुढील मागण्या केल्या आहेत
1पिकांना हमीभाव द्यावा
2.पिकांचे नुकसान भरपाई तातडीने द्यावी
3. शेतकऱ्यांसाठी पीक विमा प्रभावित लागू करावा
4. कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावावा
ते म्हणाले शेतकरी हा देशाचा एक कणा आहे त्याच्या कष्टावर संपूर्ण देश उभा आहे मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व आमदार खासदार व मंत्री निष्पर ठरत आहेत आणि आज शेतकऱ्याची व्यथा अशी झाली आहे की जगू की मरू हाही प्रश्न निर्माण होत आहे काल झालेल्या नांदेड दौऱ्यामध्ये मंत्र्यांनी व आमदार खासदारांनी काजूवर ताव मारला ही बाब कितपत योग्य आहे आणि ज्या काही अधिकाऱ्यांनी हा त्यांना नाश्ता दिला त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई व्हायला हवी कारण आज शेतकरी उपाशी मरत आहे आणि त्याच शेतकऱ्यांनी निवडून दिलेले राज्यकर्ते जर काजूवर ताव मारत असतील तर ही बाब निदनिय आहे आहे

आणि माझ्या विदर्भातील उमरखेड महागाव व यवतमाळ मधील मागील वर्षीच्या विम्याचा प्रश्न अजून काही तत्कालीन आमदार व खासदार यांनी लावून धरला नाही याला जबाबदार कोण यावरही प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button