Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

चातारी सह मतखंडात दहा तासांत तब्बल १८ वेळा वीज गुल!
महावितरणच्या लपंडावाने शेतकरी हैराण; कृषिपंप जळण्याची भीती — आंदोलनाचा इशारा


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



उमरखेड :- चातारीसह मतखंड परिसरात महावितरणच्या विजेच्या लपंडावाने शेतकरी अक्षरशः हैराण झाले असून, बुधवारी( दि, १६) सकाळी ६ ते सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत तब्बल १८ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अवघ्या दहा तासांच्या कालावधीत वारंवार वीज ये-जा होत राहिल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा नवा विक्रमच केल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून चातारी व मतखंड परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कधी पाऊस, कधी वारा तर कधी दुरुस्तीचे कारण सांगून तीन ते पाच तास वीज गायब राहण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र बुधवारी परिस्थितीने कळस गाठला. सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत तब्बल १८ वेळा वीज खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांसह घरगुती वीज उपकरणांवरही परिणाम होत आहे.

यासंदर्भात ब्राह्मणगाव, साखरा,ढाणकी तसेच उमरखेड येथील महावितरणच्या सबस्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र वीजपुरवठा वारंवार का खंडित होत आहे, याबाबत ठोस कारण किंवा तातडीची उपाययोजना सांगण्याऐवजी एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या पावसाळ्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना कृषिपंपाद्वारे पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र नेमक्या याच काळात वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने सिंचनाचे नियोजन कोलमडले आहे. वारंवार वीज ये-जा झाल्यामुळे व्होल्टेजमध्ये चढ-उतार होऊन कृषिपंप, मोटार तसेच अन्य विद्युत उपकरणे निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांचे कृषिपंप निकामी झाल्याचा दावाही करण्यात येत आहे.
महावितरणच्या अधिकृत वेळापत्रकानुसार तांत्रिक अडचणी असलेल्या कृषी फिडरवर तीन-फेज वीजपुरवठ्याचे नियोजन केले जाते. तसेच कंपनीकडून खंडित वीजपुरवठ्याची संख्या, कालावधी आणि कारणांची नोंद ठेवली जाते. त्यामुळे चातारी फिडरवर प्रत्यक्षात किती वेळा व किती कालावधीसाठी वीज खंडित झाली, याची अधिकृत नोंद तपासून दोषी यंत्रणा व तांत्रिक अडचणी स्पष्ट कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टी चे युवा नेतृत्व विद्वान केवटे व राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश कार्याध्यक्ष चक्रधर पाटील देवसरकर यांच्याशी संपर्क साधला असता, चातारी परिसरातील वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत महावितरणकडून समाधानकारक कार्यवाही झाली नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चातारी परिसरातील फिडरची तांत्रिक तपासणी करावी, वीजपुरवठ्याचे वेळापत्रक नियमित करावे आणि कृषिपंपांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button