Uncategorized

पोफाळी पोलिसांची विजेगती कारवाई

!

  • अवघ्या 2 तासांत चोरी उघड; ₹2.10 लाखांचे सोन्याचे पोत जप्त, दोन महिला ताब्यात

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : पोफाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघड करत पोलिसांनी 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारास सौ. सविता शालीकराम गडवे, रा. सुभाष वार्ड पुसद या पुसद ते पोफाळी असा प्रवास रोगांव–उमरखेड बसने करीत असताना प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या 15 ग्रॅम वजनाच्या गव्हूमण्याच्या सोन्याच्या पोतीची (किंमत अंदाजे 2,10,000 रुपये) चोरी केली. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन पोफाळी येथे तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशन पोफाळीचे पथक तसेच उमरखेड वाहतूक शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित बसचा पाठलाग केला. बेलखेड फाटा, उमरखेड येथे बस थांबवून बारकाईने तपासणी करण्यात आली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत बसमधील प्रवासी महिलांची झडती घेतली असता दोन महिलांपैकी एका महिलेच्या जवळ फिर्यादी यांची चोरीस गेलेली सोन्याची पोत आढळून आली.
पोलिसांनी तत्काळ दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन पोफाळी येथे आणले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ
कुमार चिंता (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निलेश शेंबडे, स पो नि अमोल गुंडे वाहतुक शाखा यांच्या नेतृत्वात पार पडली.
अवघ्या दोन तासांत गुन्हा उघडकीस आणत मुद्देमाल हस्तगत केल्याने पोफाळी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button