Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

धनोड्यात किराणा दुकानातून अवैध दारू विक्रीचा आरोप
ग्रामस्थांची महागाव पोलिसांकडे लेखी तक्रार; तात्काळ कारवाईची मागणी


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील धनोडा येथे प्रवीण हंसलाल जयस्वाल यांच्या किराणा दुकानातून देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी महागाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी संजय हरिभाऊ अवझाडे, अंकोष रामदास खाडे, राहुल नारायण दरणे, संतोष शामराव धारपवार, जयकुमार मिराशे, वसंत भुसेवा, अमोल धारपवार व भारती यांनी ही तक्रार देऊन किराणा दुकानातून सुरू असल्याचा आरोप केलेला अवैध दारू विक्रीचा प्रकार तात्काळ बंद करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित दुकानात यापूर्वीदेखील अवैध देशी दारू विक्री होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने कारवाई करून दारू जप्त केली होती, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.
धनोडा चौफुली परिसरातील किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची विक्री होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अवैध दारू विक्री आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि हा प्रकार तात्काळ बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button