शहर

महागाव नगरपंचायतीच्या दलितवस्ती सुधार योजनेच्या निविदेवर अनियमिततेचा आरोप; चौकशीची मागणी


महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीमार्फत दलितवस्ती सुधार योजना व इतर विकास कामांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तीन कोटी रुपयाच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित निविदा प्रक्रिया रद्द करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, यवतमाळ तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. २८ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या निविदेसंदर्भातील शासन पत्रात “सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, महागाव” असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र महागाव येथे असे कार्यालय अस्तित्वात नसल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे संबंधित पत्राच्या वैधतेबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय निविदेतील काही कामांच्या तपशीलातही विसंगती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक २ मधील रोड व नाल्याच्या कामांचा उल्लेख प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेली किंवा चुकीची कामे निविदेत समाविष्ट करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निविदा प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि स्पर्धात्मक पद्धतीने न राबविता काही निवडक कंत्राटदारांना लाभ होईल अशा पद्धतीने अटी व प्रक्रिया ठेवण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच संबंधित निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी अर्जदार आमचे प्रतिनिधी यांनी यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button