सुभाष शुगर हदगाव कारखाण्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडुण भरपाईची मागणी

ऊस तोडणी यंत्र चालकाच्या लापरवाहीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक फटका
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेडः सुभाष शुगर प्रा. ली. (हडसणी) हदगाव या साखर कारखाण्या मार्फत ऊस तोडणी यंत्राद्वारे उमरखेड तालुक्यातील कोप्रा (बु.) ता. उमरखेड येथील शेतक-याच्या शेतातील ऊस तोडणी करुण गाळपास नेण्यात आला परंतु ऊस तोडणी यंत्र चालकाने बेशिस्तपणे तोडणी यंत्र चालउन लाखो रुपयांच्या ऊसाचे नुकसाण केले असल्याची तक्रार कोप्रा (बुः) येथील महिला शेतकऱ्याने कारखाना प्रशासनाकडे केली आहे.
या बाबत सवीस्तर वृत असे की उमरखेड तालुक्यात ऊस पीकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने परीसरातील अणेक साखर कारखाण्या कडुण येथील ऊस गाळपासाठी नेल्या जात आहे.
ऊस तोडणी कामागारांच्या तुलनेत वेगाणे ऊस तोडणी करण्याच्या दृष्टीने सुभाष शुगर प्रा. ली. (हडसणी) हदगाव या साखर कारखाण्या मार्फत ऊस तोडणी कामगारा कडुण व यंत्रा द्वारे ऊसाची तोडणी केल्या जात आहे. अशातच या कारखाण्या मार्फत कोप्रा येथील महीला शेतकरी कांताबाई गणेशराव कदम यांच्या ५ एकर शेतातील तोडणी योग्य झालेल्या ऊसाची यंत्राद्वारे तोडणी करण्यात आली परंतु यंत्र चालकाच्या कामचुकारपणा मुळे सदर शेतक-याच्या शेतातील ऊसाचे लाखो रुपयाचे नुकसाण झाले असुन झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणुन नुकसाण ग्रस्त शेतकर्याने कारखाणा प्रशासणा कडे भरपाईची मागणी केली आहे. मोठ्या कष्टाने व मोठ्या प्रमाणात लागवड खर्च लाऊन पीकवीलेल्या ऊसाची यंत्र चालकाने केवळ हयगयीतुन केलेल्या नुकसाणी मुळे परीसरातील शेतकऱ्या कडुण संताप व्यक्त केल्या जात आहे.
ऊसाची शेती ही अर्थिक दृष्टया खर्चाची असल्याने ऊस पीकवीण्यासाठी वीवीध बँका कडुण कर्ज शेतकरी लागवड खर्च भागवीत असतात तब्बल १२ महीणे जोपासना केलेल्या ऊसाचे अर्थिक उत्पन मात्र १३ महीन्या नंतर हाती पडत असते.
या बाबतीत नुकसाण ग्रस्त शेतकऱ्याचा तक्रार अर्ज आपल्या पर्यन्त आला नाही परंतु तक्रार कर्त्याच्या तक्रारी वरुण कारखाण्याच्या कर्मचाऱ्या कडुण नुकसानी चा आढावा तात्काळ घेण्यात येईल.
किशोर वानखेडे
शेतकी अधिकारी सुभाष शुगर प्रा. ली
(हडसनी) हदगाव



