Uncategorized

यवतमाळच्या नोमान अहेमदचा आयटीआय परीक्षेत शतप्रतिशत यश – 600 पैकी 600 गुण मिळवत घवघवीत यश

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याचा नोमान अहेमद अतीक अहेमद या विद्यार्थ्याने शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI), यवतमाळ येथे इलेक्ट्रिशियन (NSQF) या ट्रेडमध्ये शिक्षण घेणाऱ्या नोमान ने जुलै 2025 मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत 600 पैकी 600 गुण मिळवून शतप्रतिशत निकालाचीनोंद

केली आहे. त्यांनी प्रथम वर्षात ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेले परीक्षेत 600 पैकी 597 गुण प्राप्त केले होते. दोन वर्षाच्या कारकर्दगीत त्यांनी 1200 पैकी 1197 गुण प्राप्त केले.

जुलै 2025 मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेचा तपशील पाहता, नोमान अहेमद याने खालीलप्रमाणे उत्तम कामगिरी केली –

ट्रेड प्रॅक्टिकल : 250/250

एम्प्लॉयबिलिटी स्किल्स : 50/50

ट्रेड थिअरी : 100/100

फॉर्मेटिव्ह असेसमेंट : 200/200

एकूण गुण : 600/600

नोमान अहेमद हा 2 वर्षांच्या अभियांत्रिकी ट्रेड (इलेक्ट्रिशियन) अभ्यासक्रमाचा नियमित विद्यार्थी असून, आपल्या मेहनती व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. यामुळे तो केवळ आपल्या कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा अभिमान ठरला आहे.

संस्थेतील शिक्षकांनी व सहाध्यायांनी नोमानचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यात तो उत्तम अभियंता म्हणून घवघवीत यश मिळवेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

निकाल दिनांक : 4 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर झाला असून, अधिकृत गुणपत्रिका व प्रमाणपत्रे 24 ते 48 तासांत ऑनलाईन डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button