Uncategorized

ऑगस्ट कोरडा गेल्याने हिमायतनगर तालुक्यात पिके उद्ध्वस्त; नद्या-नाले सुकले, सोयाबीन, कापूस, तुरीसह हळदीवर किडींचा हल्ला, तात्काळ ‘दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
ऑगस्टचा संपूर्ण महिना कोरडा गेल्याने हिमायतनगर तालुक्यातील बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. आता सप्टेंबर महिना सुरू होत असला, तरी एकाच महिन्याच्या पावसाने संपूर्ण हंगामाचे झालेले अतोनात नुकसान भरून निघणे अशक्य आहे. देशात ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला जातो; मात्र आज प्रत्यक्ष बळीराजाच तीव्र आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करत आहे.
​तालुक्यातील नद्या, नाले आणि बंधारे पूर्णपणे सुकले असून विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. भूजल पातळी प्रचंड खालावल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि मुख्य नगदी पीक असलेले हळद ही पिके पूर्णपणे सुकू लागली आहेत. त्यातच लष्करी अळी व इतर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने हाताशी आलेली पिके डोळ्यांसमोर नष्ट होत आहेत. महागडी औषधे फवारूनही किडी पिके खाऊन टाकत असल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च वाया गेला आहे.
​क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून तालुक्यात ‘दुष्काळ’ जाहीर करावा, पीक विम्याची भरपाई द्यावी आणि सर्व प्रकारची कर्जवसुली थांबवून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button