कासाळबेळ येथे अनोळखी मृतदेह आढळला त्याची ओळख पटली;पत्नीसह प्रियकराला घेतले ताब्यात

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यामध्ये एक महिन्यापूर्वी पैनगंगा नदी पात्रात आढळलेले अनोळखी व्यक्तीचे प्रेत काही दिवसापूर्वी कासाळबेळ येथे आढळून आले होते. त्यावेळेस त्याची ओळख पटली नाही त्यामुळे महागाव पोलीस सानी त्याचा अंत्यविधी कासाळबेळ नदीकाठी करण्यात आला होता. किनवट पोलीस ठाण्यात मिसिंग नोंदणीमुळे घडलेल्या गुन्ह्यात किनवट पोलिसांनीओळख पटवून पत्नी व प्रियकराने खुन केल्याचा संशय असून दोघांनाही किनवट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत .दरम्यान गुरुवारी १६-१०_२५ संशयात बाबी लक्षात घेत नांदेड येथील वरिष्ठ अधिकारी व महागाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पुन्हा बाहेर काढून फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आला. विनोद किसन भगत वय 52 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे .ही घटना एक महिना पूर्वीची होती. किनवट पोलिसांनी त्याच्या फोटो द्वारे ओळख पटवून चौकशी करण्यात आली .त्यावेळेस चौकशीत असे निष्पन्न झाले की पत्नीसह प्रियकराने मृतक व्यक्ती विनोद याला किनवट येथील मोठ्या पैनगंगा नदीमध्ये पुलावरून पाण्यामध्ये ढकलून दिले होते. असे सांगितले जात आहे .या प्रकरणात पती व प्रियकर ताब्यात घेऊन महागाव येथे कासाळबेळ नदीकाठी पुढील कारवाई करण्यात आली.



