महागाव नगरपंचायत घनकचऱ्याचे टेंडर बनले भ्रष्टाचाराचे खुरन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत मध्ये बऱ्याच कालावधीनंतर घनकचऱ्याचे टेंडर महागाव नगरपंचायत च्या मीटिंगमध्ये नगरसेवकांनी मंजूर केले गावातील सासलेली घाण लवकरात लवकर साफसफाई करता यावी म्हणून टेंडर मंजूर झाले 1-7- 2025 रोजी घनकचऱ्याच्या कामाला वर्क ऑर्डर देण्यात आली. परंतु ठेकेदाराने नगरपंचायत कार्यालयाजवळ साचलेला कचरा व ट्रॅक्टर भरून असलेला कचरा व कचरा नेणाऱ्या गाड्यांमध्ये कचरा भरून जाग्यावर गाड्या सडत आहे .ठेकेदाराला माणसं न मिळाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .आज पर्यंत कचरा पडून आहे हे नगरसेवकांना दिसत नाही याचे नवल आहे. कोणीही कचऱ्याबद्दल नगरपंचायत मध्ये आवाज उठवताना दिसले नाही अशा परिस्थितीत आज कचऱ्याचे जिओ ट्रेकिंग फोटो घेऊन बातमी घेतली आहे .उंबरखेड येथील जेई मोरे हे उंबरखेडहून काम पाहत आहे. त्यांना कचरा वेचत असल्याबाबत जिओ ट्रेकिंग एकही फोटो माझ्याकडे उपलब्ध नाही. तसेच नगरपंचायत 1 ते 17 वार्डामध्ये कुठे कामही सुरू नाही .तरी कचरा उचलण्याचे काम कागदोपत्री दाखविण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत आहे .त्यामुळे महागावात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. अशा परिस्थितीत बिलो मध्ये टेंडर घेतले परंतु ते टेंडर 24 लाखाच आहे. दोन लाख रुपये महिना असताना ठेकेदाराला माणसं मिळत नाही ही बाब प्रशासनाची नाही मोरे उंबरखेड ऊन कामाची पाहणी कशी करतात हे त्यांनी दाखवून द्यावे रोज जिओ ट्रेकिंग चे फोटो कामवाल्याचे घेऊन नगर पंचायत ने बीले काढायला पाहिजे जर जिओ ट्रेकिंग चे फोटो नसेल तर कोणतेही बिल काढू नये अन्यथा कामाच्या बिलाला मंजुरात देणाऱ्या अधिकाऱ्याहून बिल वसूल केले जाईल असे माजी उपाध्यक्ष सुरेश नरवाडे यांनी आमच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस गटनेता शैलेश कोपरकर यांनी आपले मत मांडताना डम्पिंग ग्राउंड ला रस्ता नाही डम्पिंग ग्राउंड साठी जी शेती सहा लाखाची असताना ती शेती तीस लाखाला मागील सत्ताधारांनी घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे कचऱ्याच्या गाड्या एक वर्षापासून जाग्यावर सडत आहे .त्यामुळे दुरुस्त करायला सामान्य फंड मध्ये पैसा नाही अशा परिस्थितीत नगरपंचायतला विकासाचा फंड उपलब्ध झाला नाही त्यामुळे कोणतीही कामे करता येत नाही असे सांगितले.



