लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा ‘बडा चौराहा’ येथे विकासाचा धडाका; पाणीटंचाई कायमस्वरूपी संपवण्यासाठी बोअरवेलचे काम सुरू!

हिमायतनगर (प्रतिनिधी शेख खयुम)
: प्रभाग क्रमांक १३ मधील पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबुब आणि लोकप्रिय नगरसेवक सरदार खान खलील खान पठान यांनी कंबर कसली असून, बडा चौराहा परिसरात बोअरवेलचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबुब यांनी ठणकावून सांगितले की, “मी जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे, त्यामुळे लोकांचे पाण्याचे प्रश्न सुटेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.” तर नगरसेवक सरदार खान खलील खान पठान यांनी ५ बोअरवेलचे उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही, असा शब्द दिला आहे.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, रमेश पंडित, शेख इलियास, हनीफ सर, शेख फेरोज खुरेशी, दौलत मिस्त्री, महेबूब खुरेशी, महेबूब टेलर आणि जैनुद्दीन पाडिकर यांची उपस्थिती होती. या विकासकामांमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.



