Uncategorized

उमरखेड सेंट्रल बँकेच्या शाखेत रोखपालच नाही व्यवहार ठप्प; खातेदारांना नाहक त्रास

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड. येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत गत 2 महिन्यापासून
रोखपालच (कॅशिअर) नसल्याने
ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. बँकेत
रोख रक्कम भरणे, पैसे काढणे तसेच इतर
व्यवहारांसाठी येणाऱ्या खातेदारांना नाहक
त्रास सहन करावा लागत आहे.
बँकेतील रोख व्यवहारच ठप्प झाल्याने शेतकरी, व्यापारी तसेच निवृत्तीवेतनधारकांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. रोखपालाच्या अनुपस्थितीत व्यवहार कसे चालवायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ग्राहकांना वारंवार ‘उद्या या’, ‘कॅश नाही’, ‘कॅशिअर नाही’ असे उत्तर मिळत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. बँकेने त्वरित नवीन रोखपालाची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व खातेदारांकडून होत आहे. त्यामुळे सबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ समस्या मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात आली. शाखा व्यवस्थापकाने याकडे लक्ष देऊन रोख व्यवहारासाठी अधिकृत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. अशी मागणी येथील पेन्शनधारक महिला सुशिला भागवत यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button