Uncategorized

यशवंत मानखेडकर निवृत्त उप संचालक नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि पत्नी मीरा मानखेडकरसह यांनी प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरष्कार स्वीकारला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते देण्यातआला. .

प्रतिनिधी पुणे जिल्हा स्नेहा उत्तम मडावी मराठी उद्योजकांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही’ — डॉ. श्रीपाल सबनीस
गौतम कोतवाल लिखित ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन; ३२ उद्योजकांच्या संघर्ष आणि यशोगाथांचा वेध
पुणे : “महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला आणि त्यामध्ये मराठी उद्योजकांचा इतिहास नसेल, तर तो इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्र आज देशाच्या विविध क्षेत्रांत नेतृत्व करत असून, राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये उद्योजकांचा मोलाचा वाटा आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.लेखक गौतम कोतवाल लिखित ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. गौतम कोतवाल यांचे हे ५५ वे पुस्तक असून, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविणाऱ्या ३२ उद्योजकांच्या यशामागील विचार, संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवासाच्या कथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन वर्ल्ड यांच्या वतीने करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “कथा, कविता आणि अन्य साहित्यप्रकारांबरोबरच कष्टकरी वर्गाला आपल्या दोन हातांना काम देणाऱ्या आणि रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योजकांचाही इतिहास लिहिला गेला पाहिजे. हा यशवंतांचा आणि गुणवंतांचा इतिहास आहे. अशा प्रकारची पुस्तके पुढील पिढीसाठी यशाची गाथा ठरतात आणि आपल्या वंशपरंपरेला अभिमान वाटेल असा इतिहास निर्माण करतात.”
ते पुढे म्हणाले, “गौतम कोतवाल यांनी सुमारे दीड हजार उद्योजकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या यशोगाथा मराठी साहित्याच्या माध्यमातून समाजापुढे आणल्या आहेत. तसेच दीडशेहून अधिक IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि अमेरिका, दुबई, थायलंड, श्रीलंका व सिंगापूर येथील मराठी उद्योजकांच्या यशोगाथाही त्यांनी लेखनातून मांडल्या आहेत. महाराष्ट्राच्या उद्योजकतेचा इतिहास लिहिताना भविष्यात गौतम कोतवाल यांच्या साहित्याचा निश्चितच संदर्भ घ्यावा लागेल. त्यांच्या कार्याचा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्याची गरज आहे.”
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त IAS अधिकारी चंद्रकांत दळवी म्हणाले, “ज्याप्रमाणे संतांनी संतसाहित्यातून महाराष्ट्रातील जनतेला आध्यात्मिक बैठक दिली, त्याचप्रमाणे उद्योजकांच्या यशोगाथांवरील लेखनातून भावी पिढीला उद्योजकतेचा दृष्टिकोन मिळेल. त्यामुळे अशा प्रकारचे उद्योजकांवरील साहित्य निर्माण होणे ही काळाची गरज आहे.”
लेखक गौतम कोतवाल यांनी सांगितले की, या पुस्तकात यशस्वी उद्योजकांचा केवळ गौरव करण्यात आलेला नाही, तर त्यांनी केलेला संघर्ष, आलेल्या संकटांवर केलेली मात, परिस्थितीतून मार्ग काढत मिळवलेले यश आणि यशानंतर त्यांनी निभावलेले सामाजिक दायित्व यांचा सविस्तर परामर्श घेण्यात आला आहे. “हे पुस्तक युवकांसाठी प्रेरणादायी असून, ‘नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना’ हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यात ‘Iconic Leader of Maharashtra’ पुरस्काराने हितेश ज्ञानदेव उपाध्ये, संचालक, MSSG Solution Private Limited आणि नितीन चव्हाण, संचालक, Waves Telephone Company यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री महावीर जैन विद्यालयाचे सेक्रेटरी युवराज शहा उपस्थित होते. त्यांनीही मनोगत व्यक्त केले.
पुस्तकातील यशोगाथांचा भाग असलेल्या अनिल राज पिसे, राजेंद्र शिंदे, प्रा. डॉ. गजानन एकबोटे, विक्रम गायकवाड, संजय वायाळ, डॉ. रमेश भोईटे, रामदास मारणे, डॉ. संतोष घोणे, दत्तात्रय यादव, प्रगतिशील शेतकरी केवळ देवरे, जयवंत शिंदे, रवींद्र मेटकर, बाबारावजी जळमकर, डॉ. वारिद अल्ताफ, संदीप भडांगे, अॅड. जितेंद्र सावंत, यशवंत मानखेडकर आणि संजय साबळे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
ग्रीन वर्ल्डच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला साहित्य, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’च्या माध्यमातून उद्योजकांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने रोजगार शोधणाऱ्यांपेक्षा रोजगार निर्माण करणारे बनावे, हा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button