महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून अवैध रेती वाहतूक!
सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची कारवाई; रेतीचा ट्रक जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू असल्याचे चित्र असतानाच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आहे. व पुढील कारवाईसाठी महागावचे
ठाणेदार वानखेडे यांना कळवले यांच्या मार्गदर्शनात जमादार गजानन ऐडकर यांनी कारवाई करत ट्रक क्रमांक MH-27-B-0619 ताब्यात घेतला. या कारवाईत सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ट्रक तसेच 18 हजार रुपयांची रेती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी बबलू शाबास खान व खाजा खान, दोघेही रा. डोंगरगाव यांच्याविरुद्ध दिनांक16 9 2026 रोजी कलम 303 (२)४८(७)४८(८)१३०,१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
डुप्लिकेट रॉयल्टीचा संशय?
महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू असताना अनेक ठिकाणी शासनाची अधिकृत रॉयल्टी नसतानाही वाहतूक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही वाहतूकदारांकडून डुप्लिकेट रॉयल्टीच्या आधारे रेती वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकाराची महसूल विभागाने सखोल तपासणी करण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या रेतीचे ट्रक रस्त्यावरून धावत असताना नियमित तपासणी व कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एखादा ट्रक पकडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा रेती घाट, वाहतूक मार्ग आणि रॉयल्टीची कागदपत्रे यांची नियमित तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महसूल विभागाने आता कठोर भूमिका घेण्याची गरज
महागाव तालुक्यातील रेती रॉयल्टी नसताना वाहतुकीची विशेष मोहीम राबवून प्रत्येक वाहनाची रॉयल्टी, वाहन क्रमांक, उत्खननाचे ठिकाण आणि वाहतूक परवानगी यांची पडताळणी करावी. बनावट अथवा संशयास्पद रॉयल्टी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून शासनाचा महसूल वाचवावा, अशी मागणी होत आहे.
एका ट्रकवर कारवाई झाली असली तरी तालुक्यात सुरू असलेल्या कथित मोठ्या प्रमाणातील अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभाग कधी लगाम घालणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यापूर्वी सुद्धा सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी महागात ट्रक पकडून कारवाई केली होती.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



