Uncategorized

दिंडाळा रोडवर वाहनाचा कहर ! 28 वर्षीय तरुण जागीच ठार, परिसरात शोककळा

सहसंपादक शेख मुजाहिद


उमरखेड : -तालुक्यातील दिंडाळा रोडवर आज रविवार, दि 12 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे नातेवाईक, मित्रमंडळी व परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राहुल साहेबराव साबळे (वय 28) असे असून तो सिद्धेश्वर नगर, बोरबन येथील रहिवासी होता. राहुल दुपारी दिंडाळा येथील आपल्या शेतातून घराकडे दुचाकीने परत येत असताना दिंडाळा रोडवर अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की राहुलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व उमरखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पुढील तपासणीसाठी उमरखेड येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर राहुलला मृत घोषित केले.


राहुल साबळे याच्या पश्चात वडील साहेबराव साबळे (मुख्याध्यापक), पत्नी, एक मुलगा तसेच आई- भाऊ असा परिवार आहे. तरुण वयात झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास उमरखेड पोलीस करीत असून अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सोबत फोटो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button