आंबोड्यात अवैध देशी दारू विक्रीवर महागाव पोलिसांची कारवाई
१६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील आंबोडा येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर महागाव पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई २२ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली.
महागाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर मुकुटे व पोलीस कर्मचारी केशव चव्हाण पेट्रोलिंग करीत असताना आंबोडा पुलाजवळ एक इसम अवैधरीत्या देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता शुभम तुकाराम खंडाजे (वय २६, रा. शिरपूर, ता. महागाव) हा संशयित इसम आंबोडा पुलाजवळ नायलॉनच्या कट्ट्यातून देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करताना आढळून आला.
पंचांसमक्ष झडती घेतली असता कट्ट्यात बॉम्बे सॅफायर कंपनीच्या ९० एमएलच्या ४०० बाटल्या आढळून आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत ४० रुपये असून एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दारू विक्री करण्याबाबत परवाना आहे का, अशी विचारणा केली असता परवाना नसल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. महागाव पोलिसांकडून अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. दारूबंदी अधिकारी कारवाई का करत नाही अशी पण चर्चा सुरू आहे महागाव येथील देशी दारू दुकानदार हा होलसेल मध्ये पेट्याने दारू विक्री करत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. देशी दारू दुकान वर कारवाई करावी अशी मागणी दारूबंदी अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे केली आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



