शहर
वंदे मातरम् गानसंध्या — कासारबेहळ शाळेत देशभक्तीचा संगम

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
वंदे मातरम् निर्मितीच्या 150 वर्षांच्या औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कासारबेहळ येथे 7 नोव्हेंबर रोजी भावपूर्ण गानसंध्या रंगली. गोपनर सर व किशोर वानोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण केले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधिर मासाकर व ग्रामसेवक पि. बि. मस्के यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि पारंपरिक गायन सादर करत वंदे मातरम् चा गौरव साजरा केला.



