करंजखेड पुल पूर्णतः पुराच्या पाण्यात खरडून गेला! चार खेड्यांच्या नागरिकांचे प्रवासा दरम्यान बेहाल

नव्याने पुलाची उंची वाढवत निर्मिती व्हावी ग्रामस्थांची मागणी
महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे करंजखेड रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. परिणामी चार ते पाच गावांचा संपर्क तुटून दळणवळन वाहतुक ठप्प झाली आहे. प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.
करंजखेड रस्त्यावरील पुलावर पावसाळ्यात नेहमीच पावसामुळे पुराच्या पाण्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. या ठिकाणच्या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षपासून प्रलंबीत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. या भागातील प्रवासी ग्रामस्थ नव्याने पुलाच्या निर्मितीच्या प्रतीक्षेत आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर, उमरखेड- महागांव विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन वानखेडे यांनी जनतेच्या समस्येची तात्काळ दखल घेत पाठपुरावा करून करंजखेड नदीपुल मंजुर करावा. पावसाळ्यात दरवर्षी नेहमीच पुराच्या पाण्याने हा मार्ग बंद होण्याची नेहमीचा प्रश्न कायम निकाली निघावा असा जनतेतून सूर निघत आहे. सदर करंजखेड रस्त्यावरील पुलाचे नव्याने उंचीचा पूल कधी मंजूर होऊन पुलाचे काम मार्गी लागुन पूर्णत्वास जाईल याची जनतेला प्रतीक्षा लागली आहे.
(बॉक्स)
सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून पुलाचे काम प्रस्तावित करावे. मुसळधार पावसामुळे करंजचेडच्या पुलावरून पाणी वाहून संपर्क तुटला आहे.अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्याही वेळेला या पुलावरून प्रवाशांना मार्गक्रम करणे दुरापास्त होते. पुराचेपाणी गावानजीक नाल्यां, नदीकाठच्या शेतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. पुलावरून पुराचे पाणी येऊन पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग विस्कळीत होणे ही नित्याची बाब झाली पुलाचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली लागावा.



