शहर
सात महिन्यांनंतर पुसद–काळी–कोणदरी–पोखरी मार्गावर बस सेवा सुरू; शाळकरी मुलींमध्ये आनंद

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद एसटी महामंडळाच्या डेपो अंतर्गत पुसद–काळी–कोणदरी–पोखरी मार्गावरील बस सेवा गेल्या सात महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे परिसरातील शाळकरी मुलींना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. अखेर गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सदर मार्गावर बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
बस सेवा सुरू झाल्यामुळे शाळकरी मुलींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी मुलींना खासगी व असुरक्षित वाहनांमधून प्रवास करावा लागत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
बस सेवा सुरू झाल्याबद्दल विद्यार्थिनींनी, पालकांनी तसेच ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि मंत्री इंद्रनील नाईक यांचे आभार मानले आहेत.



