Uncategorized

४० अंशाच्या धगधगत्या उन्हात हिमायतनगरच्या ‘सिंहा’चे ऐतिहासिक श्रमदान; जनतेच्या पाण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक थेट बंधाऱ्याच्या चिखलात!


​हिमायतनगर तालुका (शेख खय्यूम प्रतिनिधी): जेव्हा सुर्याने आग ओकायला सुरुवात केली आणि पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला, अशा अंगाची लाहीलाही करणाऱ्या भीषण उन्हात हिमायतनगरने एका ऐतिहासिक आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या नेतृत्वाची प्रचिती पाहिली! शहरावर ओढवलेले पाणीटंचाईचे संकट पाहून, एसी केबिनचा राजेशाही थाट झुगारून देऊन लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब हे स्वतः थेट मंगरूळ बंधाऱ्याच्या पाण्यात आणि चिखलात उतरले.
​शहराच्या तृष्णेसाठी सुरू असलेल्या १९ कोटींच्या ऐतिहासिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत पाणी पोहोचण्यास निसर्गाने अडथळा निर्माण केला होता. पण, जनतेची तहान भागवण्याचा ध्यास घेतलेल्या या जननायकाने कोणत्याही प्रशासकीय कागदोपत्री मंजुरीची वाट न पाहता, स्वतः हातात खोरे आणि टोपले उपसले. रखरखत्या उन्हाची आणि जीवाची पर्वा न करता, चिखलात उभे राहून त्यांनी आपल्या अथांग कष्टाने पाण्याचा बंद पडलेला मार्ग मोकळा करून दिला!
​धगधगते ऊन आणि अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा… पण चेहऱ्यावर फक्त जनतेच्या सेवेचा भाव! अधिकार पदाची घमेंड बाजूला सारून थेट मैदानात उतरणाऱ्या अशा ‘डॅशिंग’ आणि ‘दबंग’ नेत्याचे हे रूप पाहून संपूर्ण नांदेड जिल्हा आज नतमस्तक झाला आहे. हिमायतनगरच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवावा असा हा क्षण असून, “नेता असावा तर असा!” अशा घोषणांनी आज संपूर्ण तालुका दुमदुमून गेला आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button