महागाव नगरपंचायत येथे विशिष्ट पूर्ण योजनेत अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या नावाने मुख्य कार्यकारी अधिकारी व ठेकेदार यांनी केला भ्रष्टाचार!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीमध्ये सन 20 21- 22 मध्ये प्रभात क्रमांक 1 ते 17 मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नगर नागरिकांना विजेच्या सुविधासाठी अंदाजे 4 कोटी रुपये किमतीचे इलेक्ट्रिक पोल बसवण्याचे काम मंजूर करण्यात आले होते .परंतु ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे इलेक्ट्रिक पोल उभे केले असून अनेक ठिकाणी कोणतीही काम न करता 3 कोटी 61 लाख रुपयाचे बिल तात्कालीन मुख्य अधिकारी माधुरी मडावी यांच्या संगतमताने मंजूर करण्यात आले. झालेल्या कामात गंभीर तुट्या व अनियमितता आढळल्या आहेत .काम सुरू होण्या पूर्वी किंवा दरम्यान कोणतेही शानिशा व पाहणी करण्यात आलेली नाही .कामासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक पोल स्थानिक दर्जाचे असून काही ठिकाणी दुसऱ्या कंपनीचे पोल देखील आहेत. त्या पोलची कॉलिटी निकृष्ट व कमकुवत दर्जाची असून या अनियमित कामाच्या विरोधात महागाव नगरपंचायत च्या विशेष सभेत नगरसेवकांनी” इंडिगो टॅंकनो प्रोजेक्ट लिमिटेड “या कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याचा ठराव पास केला आहे .यामुळे सार्वजनिक निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असून आज पर्यंत वार्ड क्रमांक 1 ते 17 या ठिकाणी पोलवरचे लाईट व वायरिंग झाली नाही, तरीदेखील बिल दिले कसे ! हा मोठा प्रश्न पडला आहे. ठेकेदार व तात्कालीन मुख्य अधिकारी अभियंते यांच्यावर योग्य ती गुन्हेगारी व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नगरसेवकाने केली आहे.या प्रकरणात तात्कालीन उच्चस्तरीय चौकशी नेमून दोशी असणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी.याकरता राज्यमंत्री सौ मेघना बोर्डीकर (ऊर्जा विभाग) मंत्रालय मुंबई येथे दिनांक 2 -7- 2025 रोजी नगरसेवक बांधकाम व नागरी सुविधा समिती सभापती विशाल पांडे यांनी केली आहे. पण एवढ्या उशिरा काय केली ?सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.



