Uncategorized

ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनेच्या नांदेड जिल्हा महासचिव पदी शेख इलियास यांची निवड! शेख इलियास शेख नबीसाब खुरेशी यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी; नांदेड जिल्हा महासचिव म्हणून नियुक्ती.

​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘सामाजिक संघटना ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना’ या संघटनेच्या नांदेड जिल्हा महासचिव पदी शेख इलियास शेख नबीसाब कुरेशी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.
​या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख इस्माईल पत्रकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शेख इलियास शेख नबीसाब खुरेशी यांचे सामाजिक कार्यातील योगदान आणि त्यांची जनसंपर्क करण्याची पद्धत लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
​या निवडीनंतर बोलताना शेख इलियास यांनी सांगितले की, “संघटनेने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, त्याला सार्थ ठरवून समाजातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
​या नियुक्तीबद्दल त्यांचे मराठवाडा अध्यक्ष शेख खयुम महेबूब खुरेशी, जिल्हा अध्यक्ष शेख मुजम्मिल आणि तालुका अध्यक्ष शेख युसुफ शेख महेबूब यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button