Uncategorized

उमरखेड येथे पावसाची सर्वाधिक नोंद व अतिवृष्टीउमरखेड शहरामध्ये पावसाचा अहहकार अनेक घरात घुसले पाणी

मुख्य संपादक मो.9021233696

उमरखेड – तहसील उमरखेड शहरांमध्ये, वार्डामध्ये अतिदृष्टी झाल्यामुळे आणि आज 16 ऑगस्ट रोजी सकाळपासून दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे . रहीम नगर या वार्डामध्ये व रस्त्याला नदीचे रूप आलेले होते.घरामध्ये कमरे इतके पाणी साचले आहे. आभाळाने जणू काही वरूनच ढग फुटल्याने उमरखेड शहरांमध्ये पाणीच – पाणी वार्डामध्ये दिसत आहे.


हातावर आणून पानावर खाणाऱ्यांच्या घरात पाणी शिरले आहे . सामान्य गोरगरीब जनता त्रस्त झाली असून कोणतीही शासनाची मदत आतापर्यंत भेटली नाही. नितीनभाऊ भुतडा जिल्हा समन्वयक यांनी रहीम नगर वार्डामध्ये फेरफटका मारून रहीम नगरची स्वतः पाहणी केली आहे व संबंधित नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले. तसेच ढगफुटी पाण्यामुळे पुलावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.


सदर १० तासापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे उमरखेड मधील वार्डामध्ये तालुक्यातील परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.. नागरिकांनी सतर्क राहावे , बहुतेक ठिकाणी नाल्यांना पूर आला आहे म्हणून जिल्हा समन्वयक भाजपा नितीन भाऊ भुतडा यांनी परिसरातील नागरिकांना भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button