जागतिक मूलनिवासी आदिवासी दिनानिमित बोरी वन येथे प्रबोधन कार्यक्रम.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील मूलनिवासी नागरिकांच्या संस्कृती,सभ्यता आणि अधिकारी संरक्षणासाठी घोषित केलेला जागतिक मूलनिवासी दीन भारतातील तमाम 85% मूलनिवासी बहुजनांनी एकत्र येऊन हा दिवस साजरा करावा असे आवाहन भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रिय उपाध्यक्ष विद्वान केवटे यांनी केले.
ते जागतिक मूलनिवासी आदिवासी दिनानिमित बोरी (वन) येथील प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक नितीनजी उघडे, दिगंबर ब्रम्हटेके,मिलिंद चिकाटे,पांडुरंग साखरे हे होते.
यावी जननायक बिरसा मुंडा यांच्या तैल चित्राचे अनावरण करून लहान मुलांना विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजक जयदीप नखाते,सुरज मेंडके,सुरेश चिरंगे,सुमित काळे ,मंगेश काळे, मंगेश चिरंगे,दिलीप पाटील,माणिक भगत, विवेक कुरकुटे,केशव पेडेवाड यांनी तर
सूत्रसंचालन सूरज पाटील यांनी केले.



