Uncategorized

पदवीधर, शिक्षक, शेतकरी व नगरपंचायतीच्या प्रश्नांवर आमदार धीरज लिंगाडे यांना निवेदन महागाव शासकीय विश्रामगृहात विविध समस्यांवर चर्चा; महेंद्र कावळे यांची उपस्थिती


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार यांच्या महागाव दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृह येथे शिक्षक, पदवीधर, शेतकरी तसेच नगरपंचायतीशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी महागाव तालुक्यातील नागरिकांच्या वतीने विविध प्रलंबित समस्या आमदार लिंगाडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. शिक्षक व पदवीधर वर्गाच्या अडचणी, शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न तसेच नगरपंचायतीच्या विविध नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीदरम्यान उपस्थितांनी मतदारसंघातील विकासकामे, जनसंपर्क आणि नागरिकांच्या अपेक्षांबाबतही आपली मते व्यक्त केली. आगामी काळात प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी यांच्यासह विविध पदाधिकारी, शिक्षक, पदवीधर, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.
आमदार धीरज लिंगाडे यांनी उपस्थितांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत संबंधित विषय शासनाच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपस्थितांकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button