महागाव न.प.चे सत्ताधारी व विरोधक पदाधिकारी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यास असमर्थ!

भाजपा जिल्हा समन्वयक यांच्या मार्गदर्शनात शहर पदाधिकाऱ्यांद्वारे ग्राम सफाईचा देखावा दोन दिवसा करता .
महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागांव शहरात मागील सात ते आठ महिन्यांपासून सर्वत्र शहरातील सतरा ही प्रभागांमध्ये घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. सत्ताधारी काँग्रेस पदाधिकारी हेव्यादाव्याच्या राजकारणामध्ये शहरवासीयांच्या आरोग्याची खेळत आहेत. मागील सात ते आठ महिन्यापासून महागाव शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. सत्तेतील पदाधिकारी शहरातील घनकचरा व्यवस्थापन मार्गी लावण्यासाठी निष्क्रिय ठरले आहेत. त्या मुळे भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकर्त्यांनी बुधवारी शहरातील दुर्गंधी दूर करण्याचा विडा उचलला परंतु एकच दिवस फोटो पुरते काम दाखवले व दुसऱ्या दिवशी सुरेश नरवाडे नगरसेवक भारतीय जनता पार्टी यांनी काही कचऱ्याचे ढिगारे उचलून टाकले परंतु संपूर्ण वार्डामध्ये घाण्याचे

साम्राज्य जशास तसे नागरिकांना पाहायला मिळाले आहे. त्या मुळे जनतेला एका दिवसाचा दिलासा मिळाला प्रसिद्धीपुरतं केल्याचे दिसून आले नितीन भुतडा भाजप जिल्हा समन्वयक यांचे शहरामध्ये पोस्टर लावून महागाव शहर सुंदर आणि स्वच्छ करण्याचा विडा देखावापुरताच व प्रसिद्धीपुरता दिसून आल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली
महागाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेस, शिवसेना सत्ताधारी पक्षाचे सरकार अस्तित्वात आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक आहेत मागील सात ते आठ महिन्याचा कालावधीत लोटूनही शहरामध्ये प्रचंड प्रमाणात पसरलेल्या घाणीचे विल्हेवाट लावली जात नाही. घनकचर्याचे टेंडर लावून सदर यंत्रणे कडून प्रभावीपणे शहरांमध्ये घनकचरा निर्मूलन करण्यासाठी सत्ताधारी प्रशासन असमर्थ निष्क्रिय ठरले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने सतरा ही प्रभागांमध्ये प्रचंड प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरून प्रभागामध्ये इतरत्र वाहत आहेत. या घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी अनेक रुग्ण मलेरिया बिमारीने त्रस्त झाले आहे. मागील एका अनेक वर्षापासून कोण्याही प्रभागांमध्ये डास निर्मूलनासाठी फवारणी करण्याची गरज असताना उपाययोजना करण्यात आली नाही. नगरपंचायत कार्यालयामध्ये औषधी साठा उपलब्ध असून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना जनतेच्या सोयी सुविधेचे काहीएक देणेघेणे राहिलेले दिसत नाही. त्या मुळे 20 ऑगस्ट बुधवार पासून महागाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 ही प्रभागांमध्ये साफसफाईचे कार्य एका दिवसा पुरते हाती घेण्यात आले आहे. व त्या कामाला सर्व वृत्तपत्रात देखाव्यापूर्ती प्रसिद्धी दिली आहे. स्वच्छतेची सुरुवात प्रभाग क्र.1 मधून महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणापासून शहरांमधील सर्वत्र प्रभागात भाजपाच्या स्वच्छता मोहिमेस आज सुरुवात झाली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात सक्रिय कार्यकर्ते तथा नगरपंचायतीचे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांच्या नेतृत्वात साफसफाईचे कार्य हाती घेण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या आजारा पासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला आघाडी सदस्या, फोटो पुरत्या उपस्थित होत्या नगरसेवकांनी महागाव शहरातील प्रभाग 1 ते 17 मधील घनकचरा, दुर्गंधी स्वच्छ करून शहर स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाची सुरुवात प्रभाग 1 मधून करण्यात आली.संपूर्ण शहरातील कचरा उचलून शहर सुंदर स्वच्छ करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी महागाव शहर पदाधिकाऱ्यांनी देखाव्या पुरता केला होता .मात्र तो दोन दिवसा पुरता देखावा स्वरूपात राहिला , महागाव शहरामध्ये प्रभाग 1 ते 17 मध्ये घनकचरा चे ढिगारे आजही जागोजाग पडलेले दिसत आहेत .त्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात महागाव शहरात पसरली आहे. घनकचरा टेंडर वाला महागाव शहरात काम करण्यास तयार नाही. परंतु सत्ताधारी पदाधिकारी काही ठराविक ठिकाणचे जिओ फोटो घेऊन काम करत असल्याचे दिखावा करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करत मीच खरा सेवक असल्याचे चित्र प्रसिद्धी माध्यमात प्रकाशित करून वाजा गाजा करत असल्याचे दिसून आले नागरिकांमध्ये तशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सुंदर शहर करण्याचे स्वप्न भंग झाल्याचे दिसून आले आहे.



