पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलिसांचा चोख बंदोबस्त; हिमायतनगर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार मॅडमना काँग्रेसचे निवेदन

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन दत्तात्रय सूर्यवंशी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार मॅडमना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाच्या वेळी तहसील परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अजमोद्दीन पाशामियाँ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती, तर बीट जमादार नामदेव जाधव व बीट अंमलदार शेख लायक यांनी सुरक्षेच्या नियोजनात विशेष सहकार्य केले. पोलीस अंमलदार, होमगार्ड आणि महिला होमगार्ड पथकाच्या कडेकोट बंदोबस्तामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत व सुरळीतपणे पार पडली.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



