उमरखेड विधानसभेतील अभियंत्यांचा आमदाराने घेतला क्लास..!पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची दिली ताकीद.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड -/ महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याला तोंड देण्यासाठी तसेच पावसामुळे रस्त्यांची होणारी दुर्दशा पाहता नागरिकांच्या तक्रारी येऊ नये म्हणून आज दिनांक 14 मे रोजी उमरखेड – महागाव विधानसभेतील सर्व विभागाच्या अभियंत्यांचा क्लास आमदार किसन वानखेडे यांनी घेत त्यांना पावसाळ्यापूर्वी उमरखेड विधानसभेतील सर्व सुरू असलेल्या व रखडलेल्या रस्त्यांचे कामे पूर्ण झालीच पाहिजे अशी ताकीद दिली .
अनेक ठिकाणी उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून वेळेच्या आत कामे पूर्ण होत नसल्याच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधीकडे येत आहेत. कामांना वेळ लागत असल्यामुळे व वेळेवर रस्ते पूर्ण होत नसल्यामुळे काही काम चुकार अभियंत्यांच्या कारणामुळे लोकप्रतिनिधींना तसेच सरकारवर नागरिक शिंतोडे उठवितात . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आमदार किसनराव वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, शिंदे सेनेचे नेते चितांगराव कदम ,भाजपा नेते दत्त दिगंबर वानखेडे यांच्या उपस्थितीत उमरखेड जिल्हा परिषद, सा . बा . विभाग, नगरपालिका , ढाणकी नगरपंचायत, महागाव नगरपंचायत, तसेच महागाव जिल्हा परिषद , साबा . विभाग यांच्या सहित प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यासह स्थानिक नगरपालिका येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत बंदी भागा सहित उमरखेड शहर, महागाव शहर ,महागाव तालुक्यातील कामे तसेच उमरखेड तालुक्यातील कामांचा आढावा घेत अपूर्ण रस्ते जिथे राहिले आहेत त्या रस्त्यांना 15 जून पर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करा अशा सूचना देत कामाच्या साइटवर आवर्जून संबंधित अभियंता हजर दिसला पाहिजे अन्यथा त्याचा अहवाल आपण पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी दिला . कुठल्याही रस्त्यावर झाडांच्या लटकलेल्या फांद्या दिसू नये तसेच कामे ठेकेदारांच्या भरोशावर होत असून अभियंते विविध कारणे दाखवून कामे वाऱ्यावर सोडत असल्याचे आढळून आल्याचेही यावेळी आमदारांनी सांगून अभियंत्यांना धारेवर धरले . कामांमध्ये कुठे अडचण आल्यास थेट आपल्याशी संवाद साधण्याचे आवाहन करून कुठलीही अडचण आल्यास सांगावी मात्र रस्त्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी यायला नको असे स्पष्ट करीत कामे पावसाळ्यापूर्वी कुठल्याही परिस्थितीत झालीच पाहिजे असे यावेळी भाजपा समन्वयक नितीन भुतडा यांनी अभियंत्यांना ठणकावून सांगितले . विधानसभेतील हॉट मिक्स राहिलेले कामे पावसाळा सुरू होण्याअगोदरच निकाली काढा, रहदारीला अडथळा होईल व रस्त्यावर पाणी साचेल त्या अगोदरच कामावर जातीने लक्ष देऊन कामे पूर्ण करा व रेकॉर्ड हे कार्यालयात बसून न करता साइटवर हजर राहावे रेकॉर्ड घरी बसून करा अशा सूचना देखील यावेळी अभियंत्यांना करण्यात आल्या.
◆बॉक्स–उमरखेड, महागाव विधानसभेतील अभियंत्यांनी कामाशी प्रामाणिकता ठेवून कामे केल्यास उमरखेड – महागाव तालुक्याचा चेहरा मोहरा विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या दिवसात निश्चितच बदललेला दिसून येणार आहे . त्यासाठी आजची अभियंत्यांची बैठक ही पहिले पाऊल असून सिमेंट रस्ता झाल्या बरोबर क्युरींग होत असतांना रस्ते वाहतूकीसाठी मोकळे करू नका काही दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागेल मात्र रस्ते चांगले होतील याबाबत या बैठकीत अभियंत्यांना सुचना करण्यात आल्या आहेत .
नितिन भुतडा
भाजपा, यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक.



