Uncategorized

महागाव तालुक्यात एलपीजी पुरवठा रखडला; शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी अपूर्ण


महागाव (प्रतिनिधी संजय नागरगोजे
जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना १०० टक्के एलपीजी गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १३ मार्च २०२६ रोजी जारी केले असतानाही महागाव तालुक्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे समोर आले आहे.
या आदेशानुसार शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे, अंगणवाडी तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत चालणाऱ्या स्वयंपाकगृहांना एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात पुरवठा विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही न झाल्याने अनेक शैक्षणिक संस्था अडचणीत सापडल्या आहेत.
तालुक्यातील काही मुख्याध्यापकांना गॅस सिलिंडरसाठी पुरवठा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. विशेषतः भांगे मुख्याध्यापक यांनी याबाबत तक्रार नोंदवली असून, परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे.
शासनाच्या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, शासकीय व अनुदानित संस्थांमध्ये गॅस पुरवठा खंडित होऊ नये. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून पुरवठा सुरळीत ठेवावा आणि दररोज अहवाल सादर करावा, असे निर्देश आहेत.
या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील अंमलबजावणीतील त्रुटींमुळे मध्यान्ह भोजन योजनेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षित व स्वच्छ इंधनाच्या उपलब्धतेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button