Uncategorized
शेतकऱ्यांनी आपला झेंडा तयार करावा माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातून तुळजापूर नागपूर हायवेने उंबरखेड कडे जाताना महागाव येथे शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले त्यांचा दौरा उंबरखेड तालुक्यात सहस्त्रकुंड विद्युत प्रकल्प होऊ नये त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असल्यामुळे मोठे आंदोलन उभे करण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता माझा दौरा असल्यामुळे मी तेथे कार्यक्रमाला जात आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी एक होऊन शेतकऱ्यांचा आपला झेंडा तयार करावा देशामध्ये अनेक पक्ष तयार झाले आहे परंतु शेतकऱ्यांचा मतापुरता उपयोग करून घेतात शेतकऱ्यांचा वापर त्यांच्या सोयीनुसार करून घेतात अशा परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांनी जागृत व्हायची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकरी बांधवांना आमच्या प्रतिनिधीला बोलताना दिली आहे.



