Uncategorized

वेणी लोअर ऊस प्रकल्पातून पूस नदीपात्रात पाणी सोडले; नागरिकांना दिलासा. वृत्तपत्राची दखल


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव येथील वेणी लोअर ऊस प्रकल्पातून पूस नदीपात्रात तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते संभाजी साहेब नरवाडे व सामाजिक कार्यकर्ते जयंत चौधरी, अतुल शिंदे, नारायण शिरभीडे, सुजित ठाकूर, गजानन साबळे, सुरेश नरवाडे ,दीपक आडे ,गजानन पाटील,तसेच महागाव येथील सर्व नगरसेवकांनी केली होती.
या मागणीची वृत्तपत्रांमधून दखल घेत उमरखेड-महागाव मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली.
या भागातील नागरिक, गुरेढोरे तसेच वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. नदीकाठच्या गावांमध्ये दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती निर्माण होत होती. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला.
अखेर आज आमदारांच्या उपस्थितीत वेणी धरणातून पूस नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, गुरेढोरे व वन्यजीवांसाठीही हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच लवकरच बंधाऱ्यावरील गेट बसविण्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button