Uncategorized

आर्य वैश्य समाजाच्या अध्यक्षपदी अँड. राजेश्वर रायेवार, तर उपाध्यक्षपदी विवेक कन्नावार

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड तालुका आर्य वैश्य समाज संघटनेची पंचवार्षिक कार्यकारणी स्थापन करण्यासाठी दिनांक 23. जानेवारी रोजी स्थानिक आर्य वैश्य भवन येथे बैठक पार पडली. त्यामध्ये समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष या पदाकरिता अँड. राजेश्वर रायेवार, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विवेक कन्नावार, तर सचिव पदी उदय पत्तेवार, व सहसचिव पदी सुचित डुब्बेवार, यांची निवड करण्यात आली तर कोषाध्यक्ष वैभव कोडगीरवार व सहकोषाध्यक्ष रत्नाकर कवटीकवार, तपासणीस पदी डॉक्टर अनिल गंधेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळेस गठीत झालेल्या नव्या कार्यकारणी कडून समाजहित कार्य करण्याचा मानस असल्याचे मत यावेळेस उपाध्यक्ष विवेक कन्नावार यांनी व्यक्त केले नवनियुक्त पदाधिकाऱ्याचा शाल व श्रीफळ देऊन या सर्व पदाधिकाऱ्याचे समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले. नवनिर्वाचित कार्यकारणी ची समाज बांधवांसह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button