नैसर्गिक आपत्ती प्रशिक्षण लोअर पुस वेणी धरण येथे सराव करताना

प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात आज दि. 8 जून 2025 रोजी वेणी धरण येथे दुपारी 11ते1 वाजेपर्यंत दिग्रस व पुसद येथील संयुक्त कर्मचारी उपविभागीय अधिकारी श्री आशिष बिजवल साहेब पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पुसद महादेव व नायब तहसीलदार कदम ,तसेच मंडल अधिकारी धुळधुळे ,मार्कंड ,भवरे व तलाठी शेळके व इतर नऊ ते दहा कर्मचारी यांना बच्छाव स्वछ पथक यवतमाळ यांनी वेणी धरण येथे बोटच्या साह्याने प्रशिक्षण देऊन सराव करण्यात आला त्यावेळेस नगरपंचायत पुसद येथील अग्निशामक कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस नागरिकांचे जीव कसे वाचवायचे तसेच उपाय करण्याचे मार्गदर्शन व सराव यवतमाळ येथील बचाव स्वच्छ पथक यांनी वेणी धरण बोटच्या साह्याने पाण्यामध्ये करून दाखवले. त्यावेळयेथ वेनी येथील तात्या शिंदे , प्रवीण पुंडे ,विनोद शिंदे, संजय शिंदे ,अनिल शिंदे व वेणी येथील नागरिक हजर होते महागाव तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अनंतवाडी, थार, कासाळबेळ, सेवानगर ,धनोडा, येथील नागरिकांना हेलिकॉप्टर च्या साह्याने व बोटच्या साह्याने नागरिकांचे जीव वाचवताना मोठी कसरत करावी लागली हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेली आहे .तात्काळ सहकार्य करता यावे म्हणून दिग्रस, पुसद, यवतमाळ येथील कर्मचाऱ्यांना महागाव तालुक्यात वेणी येथे प्रशिक्षण सराव करण्यात आला. त्यावेळेस महागाव तहसील येथील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती दिसून आली नाही. तसेच अविनाश भगत उपअभियंता पाठ बंधारे विभाग क्रमांक 4 व सहाय्यक अभियंता निशाण लहाने यांच्या अधिपत्याखाली असलेले वेणी धरण येथे प्रशिक्षण सुरू असताना धरणाच्या पाण्यामध्ये सराव सुरू असताना त्यांनी या शासकीय कामाला प्राधान्य दिले नाही .