अधिकारी ही उतरले विधानसभेच्या आखाड्यात

इच्छुक अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी पक्षश्रेष्ठींना घालणार गळ
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड आगामी विधानसभा निवडणुकीचा लवकरच शंखनाद होणार आहे यासाठी बरेच जण इच्छुक असून इच्छुकांमध्ये आता अधिकारी वर्गही सज्ज झाला असून महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये असणारे अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहे. यामुळे उमरखेड विधानसभेसाठी इच्छुकांची जाम गर्दी झालेली दिसून येत आहे.
उमरखेड-महागाव तालुका मिळून उमरखेड विधानसभा मतदारसंघ अजूनही विकासापासून उपेक्षितच आहे. कोणतेही मोठे उद्योगधंदे आणण्यात आजवर कोणताही आमदार यशस्वी ठरले नाही तसेच बंदी भागातील समस्या सोडविण्यासाठी देखील प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत आश्वासनेच दिली. दहा वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह उमरखेडला विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी आले असताना ढाणकी
तालका करणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती पण दहा वषानंतरही तालुका तर सोडा ढाणकी शहरातील पाण्याची समस्या सुद्धा सत्ताधाऱ्यांना दूर करता आली नाही. बंदी भागातील रस्ते विकासापासून कोसो दूर आहेत. आजही मरण यातना सोसाव्या लागतात. रस्त्यावर प्रवास करताना जीव मुठीत घ्यावा लागतो. आरोग्याचा प्रश्नही बिकट आहे. तर कोट्यावधी रुपये खर्च करून ऊमरखेड शहरात पाच वषार्पासून सुसज्ज असलेली इमारत देखील उद्घाटना अभावी धूळ खात पडून आहे तर उपजिल्हा रुग्णालयाला देखील अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे रेफरचा आजार जडला आहे उमरखेड शहरातील कोणत्याही रस्त्याने जा खडूयातूनच प्रवास करावा लागतो आहे. कोट्यवधींच्या विकास कामात अजूनही उमरखेड शहराचा विकास झालाच नाही. महागाव तालुक्याची सुद्धा हीच परिस्थिती आहे. अशा अनेक समस्या असलेल्या विधानसभेत आजपर्यंत कोणताही राजकीय वारसा नसताना देखील अनेकांना संधी मिळाली आहे. यामध्ये ऑटो चालक असलेले राजेंद्र नजरधने यांना आमदार केले होते. याच पद्धतीने विद्यमान आमदार नामदेव ससाने हे तहसील कार्यालयासमोर स्टॅम्प विक्री करत असताना सुद्धा त्यांना पक्ष नेतृत्वामुळे नगराध्यक्ष पद मिलाले यासोबतच डबल लॉटरी लागून त्यांना आमदार केले. आगामी विधानसभा निवडणुकीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व समृद्धी महामार्गात सुद्धा अधिकारी असलेले साहेबराव कांबळे यांनी गेल्या दोन वषार्पासून नोकरीचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात अभियंता पदावर राहिलेले आणि सेवानिवृत्त झालेले दत्ता गंगासागर यांनीही आमदारकीची स्वप्ने रंगविण्यास सुरुवात केली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. भारतीय जनता पक्षाकडून गेल्या दहा वर्षात दोन आमदारांना संधी देऊन विधानसभेवर आपला झेंडा रोवला आहे. उमरखेड विधानसभेच्या इतिहासात एकच आमदार सलग दोन वेळा निवडून आलेला नाही त्यामुळे याही वेळेस नवीन चेहरा समोर करून त्यांना निवडन आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. उमरखेड
शहरात पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून प्रवीण वानखेडे यांनी प्रत्येक खेड्यापाड्यातील जनतेला आपल्या स्तरावरून पूर्ण न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. शासनाच्या प्रत्येक योजना राबविण्यात ते अग्रेसर असतात. याबाबत त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन देखील त्यांचा गौरव केलेला आहे. त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपणास संधी दिल्यास उमरखेड विधानसभेत काम करून ऊमरखेड विधानसभेचे नाव राज्याच्या नकाशावर वेगळ्या पद्धतीने विकासात्मक कामे करून कसे येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे सांगितले आहे. असे असले तरी आजपर्यंत त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला नाही हे विशेष. उमरखेड विधानसभेत आजपर्यंत अनेकाला संधी मिळाली आहे त्यामुळे आगामी विधानसभेत अधिकारी आमदार होणार का ? याकडे जनतेचे लक्ष
लागले आहे