Uncategorized

सुकळी ( ज ) सरपंच दोनच दिवसात पून्हा भाजपामध्ये

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

तालूक्यातील सुकळी (ज ) येथील सरपंच प्रणाली रवि मस्के यांनी दोन दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता .मात्र आता त्यांनी दोन दिवसानंतर पून्हा भाजपामध्ये प्रवेश केल्याने सुकळी (ज ) हे गाव राजकीय दृष्ट्या तालुक्यात चर्चेत आले आहे .
प्रणाली मस्के ह्या भाजपा गटाकडून थेट सरपंच निवडणूकीत निवडून आल्या आहेत परंतू गावातील अंतर्गत गटबाजीमुळे दोन दिवसाअगोदर त्यांनी
काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आता पून्हा त्यांनी भाजपाचे जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे . यावेळी
ज्येष्ठ नेते मधुकरराव गंगात्रे, सुभाष रावजी कदम, सखाराम पाटील वानखेडे, बालकराम पाटील वानखेडे, चंदू पाटील, वानखेडे सर, राजेश गंगात्रे, अतुल खंदारे, पवन मेंढे, उपसरपंच शिवाजीराव रावते, विष्णू पाटील वानखेडे, आकाश गंगात्रे, त्रेंबक गंगात्रे, आदिनाथ वानखेडे, शेख जहांगीर भाई, कामाराव कदम, सरपंचाचे पती रवी केशव मस्के, सरपंचाचे दीर दशरथ केशव मस्के, सुरज ज्ञानेश्वर वानखेडे, राजू नागोराव वानखेडे नागेश पाटील वानखेडे, विश्वास वानखेडे, गोविंदा वानखेडे, मोतीराम कदम, शेख हमीद भाई, महेश शिंदे सेवादास राठोड,श्याम राठोड, शेख हबीब, शेख जाकीर, व भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!