Uncategorized

महापुरात जनता संकटात, आधारवडासारखे धावले आमदार किसनराव वानखेडे!

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

२४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज – “माझी जनता हीच माझी मायबाप – आमदार किसनरावजी वानखेडे

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे उमरखेड व महागाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराच्या पाण्याने गावांना वेढा घातल्याने अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धडपड करत आहेत. शेतशिवार जलमय झाले असून शेतकऱ्यांचे अन्नधान्य, पिके आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही गावांत रस्ते खचले, पूल वाहून गेले तर नाल्यांना तुफानी प्रवाह आल्याने गावाकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत.

या भीषण परिस्थितीत उमरखेड-महागाव मतदारसंघाचे आमदार श्री. किसनराव वानखेडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरून कामाला सुरुवात केली आहे. गुडघाभर पाण्यातून, चिखलातून, तुटलेल्या पुलांवरून वाट काढत ते थेट गावोगाव पोहोचत आहेत.

आमदार किसनरावजी वानखेडे साहेब यांची कार्यशैली गावातून मदतीचा फोन आला की तात्काळ घटनास्थळी धाव घेणे.तहसील प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, अग्निशमन दल यांना सोबत घेऊन समन्वय साधणे.ट्रॅक्टर, बोट, जेसीबी आदींच्या मदतीने लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पुढाकार.रुग्णांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवून त्यांच्यासाठी औषधोपचाराची सोय.पुरामुळे अडकलेल्या कुटुंबांना तात्काळ अन्नधान्य व पिण्याचे पाणी पोहोचविण्याची व्यवस्था.शाळा, मंगल कार्यालय, शासकीय इमारती येथे तात्पुरते निवारे सुरू करून पीडितांना सुरक्षित ठिकाणी आश्रय.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला.पुढील काही दिवसांत परिस्थिती हाताळण्यासाठी ‘आपत्कालीन नियोजन समित्या’ गावागावात सक्रिय केल्या.जनतेशी हृदयस्पर्शी संवाद

“गोरगरीब जनता हीच माझी मायबाप आहे. संकट काळात प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे ही माझी जबाबदारी आहे. गावोगाव पुरामुळे कोणीही असहाय्य राहू नये, हा माझा प्रयत्न आहे.”
– आमदार किसनराव वानखेडे जनतेत विश्वासाचे वातावरण

ग्रामस्थांमध्ये असा विश्वास निर्माण झाला आहे की, “संकट काळात आमदार साहेब नक्की धावून येतात.” त्यांच्या सततच्या उपस्थितीमुळे प्रशासनातही चैतन्य निर्माण झाले असून मदतकार्याची गती वाढली आहे. अडकलेल्या कुटुंबांचे स्थलांतर, औषधोपचार, पशुखाद्य, अन्नधान्य व तात्पुरत्या निवाऱ्याच्या सोयीमुळे जनता काही प्रमाणात दिलासा अनुभवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button