Uncategorized

ईव्हीएम मशीन घेऊनजाणारी बस एक तास रस्त्यावर बंद

उमरखेड आगार व्यवस्थापक सावळागोंधळ कारभार चव्हाट्यावर

उमरखेड चे सहाय्यक वाहतूक निरीक्षक कुठे गेले होते

उमरखेड चे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक बदाडे हलगर्जीपणा पणा


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

निवडणूक कामामध्ये वापरण्यात येत असलेले उमरखेड एसटी डेपोतील कार्गो वाहन (माल वाहतूक ) जे ईव्हीएम मशीन घेऊन हिंगोलीला जात होते ते उमरखेड जवळच्या पेट्रोल पंपावर पंक्चर झाले त्यामुळे या पथकातील सगळ्या वाहनांना एक तास पर्यंत तात्काळत रोडवरच उभे राहवे लागले .निवडणुकी सारख्या महत्त्वपूर्ण कामात ज्यात लोंकाचे त्यांच्या उमेदवारसाठी दिलेले मत बंद पेटीत बंद असलेल्या वहानातून काटेकोर स्वरक्षण मध्ये नेत असताना असे फालतू वाहने उमरखेड एसटी डेपोतून पुरविण्यात आले कसे व त्याचे टायर खराब असलेले कार्गो वाहन देण्यात आले कसे? यामुळे ई व्ही एम मशीन मध्ये काही गैरवर्तन झाल्यास याची जबाबदारी कोणाची?याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे . सूत्रांच्या माहितीप्रमाणे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांच्या कार्यालयातून या बेजबाबदार पणाबद्दल एसटी डेपोला नोटीस बजावण्यात आल्याची खात्रीदायक माहिती आहे .परंतु उमरखेड निवडणूक निर्णय कार्यालयातून या बेजबाबदार पणाबद्दल उमरखेड येथील एसटी डेपो कार्यालयाला नोटीस बजावण्यात आलीअसलेतरी .या संदर्भात काय कारवाई होते याकडे परिसरातील मतदारांचे लक्ष लागले आहे . अशा बेजबाबदार पणे कार्य करणाऱ्या एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांची त्वरित हकालपट्टी झाली पाहिजे तसेच यापूर्वी सुद्धा डिझेल भरत असताना पूर्ण डिझेल पंपच एसटी सोबत तुटून गेला होता या संदर्भात सुद्धा अनेक बातम्या प्रकाशित झाल्या असतानी सुद्धा दोषी कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यावर मात्र अद्याप कारवाई झालेली नाही पण अतिशय महत्वाचे मतदार मताचे पेटी असलेले भंगार गाडी पुरविण्यात आली याकडे सुद्धा एसटी डेपोचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे असे गलतानपणाचे काम एसटी डेपोत घडत असल्याचे बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!