शैक्षणिक

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 4 वर्षीय ज्योतीनाथ चौधरीला सुवर्णपदक

चौधरी कुटूंबातील पाचही भावंड ठरले वेगवेगळ्या पदकाचे मानकरी

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


किनवट येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरिय खुल्या कराटे स्पर्धेत उमरखेड येथील 4 वर्षिय बाबा उर्फ ज्योतिनाथ सर्जेराव चौधरी पाटील या चिमुकल्याने थरारक लढती करून प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे . यासह याच कुटुंबातील 5 भावंडांनी सुद्धा विविध पदके मिळवून राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे .
किनवट येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरिय कराटे स्पर्धेत राज्यातील एकुण 400 विद्यार्थी सहभागी झाले होते . उमरखेड येथून कराटे प्रशिक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता . यामध्ये वयाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांसोबत थरारक लढती देत 4 वर्षिय बाबा उर्फ ज्योतिनाथ सर्जेराव पाटील चौधरी या चिमुकल्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवत सुवर्णपदक मिळविले तर गजराज किसनराव चौधरी , प्रताप किसनराव चौधरी , स्वराज मारोतराव चौधरी , ऋतुराज मातोतराव चौधरी पाटील हे थरारक लढतीत विविध पदकांचे मानकरी ठरले असून त्यांच्यासह राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांसोबत उमरखेडच्या स्पर्धक विद्यार्थ्यांनीही शानदार प्रदर्शन केले आहे. या चिमुकल्यांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!