उमरखेड येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा संपन्न .

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड , गोपिकाबाई सितारामजी गावंडे महाविद्यालय उमरखेड, , तेजमल गांधी जुनियर कॉलेज ब्राम्हणगाव, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारी यांच्या संयुक्त विद्यमाने गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .कौशल्य, रोजगार, ऊद्योजगता व नाविन्यता विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने व जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ प्रा. डाॅ डी व्ही.तायडे गो .सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड ,प्रमुख अतिथी म्हणून व्ही. एन. सादुडे, प्राचार्य तेजमल गांधी कनिष्ठ महाविद्यालय ब्राह्मणगाव , श्री पी.एन पेन्टेवाड प्राचार्य श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारी , महिंद्रा अॕंड महिंद्रा ग्रुप छत्रपती संभाजी नगरचे प्रतिनिधी श्री सुनील गवई, इंड्युरन्स ग्रुप प्रा.लि. पुणे चे प्रतिनिधी श्री पाटील , नमस्कार ऍग्रो इंडस्ट्रीज उमरखेड चे संचालक निखिलजी भट्टड, व मेळाव्याचे मुख्य आयोजक श्री डी पी पवार प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड , तसेच उमरखेड परिसरातील व तालुक्यातील विविध खाजगी आस्थापनांचे प्रतिनिधी व मेळाव्यासाठी सहभागी परिसरातील युवा महिला व पुरुष प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती लाभली . मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार भरती मेळाव्याचे सुरुवात दीप प्रज्वलन व प्रमुख अतिथींच्या स्वागताने करण्यात आली आपल्या
प्रस्ताविक भाषणात डी पी पवार प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था ऊमररखेड यांनी उपस्थित युवा प्रशिक्षणार्थी व आस्थापनांचे प्रतिनिधी यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप , शासनाचा उद्देश उद्दिष्टे यांची सखोल माहिती देऊन आस्थापना व प्रशिक्षणार्थींना यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून मिळणारे फायदे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले व सदर योजनेमध्ये जास्तीत जास्त शासकीय ,निमशासकिय व खाजगी आस्थापना तसेच गरजू बेरोजगार युवा प्रशिक्षणार्थींनी यांनी सहभागी घेऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या तसेच कौशल्य विकास विभागाच्या व शासनाच्या विविध विभागाच्या रोजगार व स्वयंरोजगार साठीच्या विविध योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाचा व अनुभवाचा फायदा करून घ्यावा व भविष्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी सदर योजनेचा फायदा घेऊन रोजगार व स्वयंरोजगार मिळवावा व स्वतः आत्मनिर्भर होऊन कुटुंबाच्या समाजाच्या व देशाच्या विकासामध्ये खारीचा वाटा उचलावा असे विचार मांडले सदर कार्यक्रमांमध्ये श्री पेंटेवाड सर यांनी व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व उपस्थित प्रशिक्षणार्थींना करून दिले , कार्यक्रमांमध्ये सहभागी विविध आस्थापनांचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या आस्थापनांच्या माध्यमातून युवा प्रशिक्षणार्थींना देण्यात येणाऱ्या लाभाविषयी माहिती देऊन जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी यांनी फायदा घेण्याचे आवाहन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रा. डॉ. तायडे सर यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती व बेरोजगारीची समस्या यावर मात करण्यासाठी शासनाच्या शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाच्या तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठीच्या विविध योजना चा फायदा ग्रामीण भागातील सर्व गरजू प्रशिक्षणार्थ्यांनी करून घेण्याबाबत अमोल मार्गदर्शन केले सदर रोजगार मेळाव्यासाठी उमरखेड परिसरातील तसेच छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील विविध आस्थापनांचे एकूण ८० पेक्षा जास्त प्रतिनिधी व ३४५ युवा प्रशिक्षणार्थी हजर होते सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर विविध आस्थापनांचे प्रतिनिधी यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकूण 110 प्रशिक्षणार्थींची युवा कार्य प्रशिक्षणार्थी या पदासाठी निवड केली तसेच पुणे व छत्रपती संभाजी नगर येथील महिंद्रा व महिंद्रा ग्रुप तसेच इंड्युरन्स ग्रुप व इतर कंपन्या यांनी आयटीआय उत्तीर्ण असलेल्या प्रशिक्षणार्थींची शिकाऊ उमेदवारी योजना व ट्रेनी प्रशिक्षणार्थी साठी एकूण ६० प्रशिक्षणार्थ्यांची निवड या मेळाव्यामध्ये केली याप्रमाणे सदर मेळाव्यामध्ये एकूण १७० प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच शिकाऊ उमेदवारी योजनेचा लाभ मिळाला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर जे.डहाके सर गो.सी.गावंडे कॉलेज उमरखेड व आभार प्रदर्शन श्री महेश पानपट्टे सर, श्री तेजमल गांधी कनिष्ठ महाविद्यालय ब्राह्मणगाव यांनी केले
सदर मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आय टी आय उमरखेडचे चे गटनिदेशक श्री संजय खुटाफळे शिल्प निदेशक सर्वश्री ए डी कुंभारे, ए जी देशमुख, संजय साबळे, शिवानंद निंबोळकर, निखिल परोपटे, एस .बी. इंगोले, ए टी गवई, के एम शिंदे, बी एस नरवाडे, पंकज कदम, जी जी चिंचाळे, मयुर कुंभारे, सौ एस डी नरवाडे, कु. कवाने,, कु. निंबैकर, कृष्णा सुर्यवंशी, उमेश सोनूवले , विजय थोंबाळे, आदित्य भोसले, श्री कांबळे श्री दिलीप धुळे श्री गोदाजी पोपुलवाड तसेच गो.सी.गावंडे कॉलेज उमरखेड, श्री तेजमल गांधी कनिष्ठ महाविद्यालय ब्राह्मणगाव ,श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारी या संस्थेतील श्री आर डी राऊत , श्री पेठे सर, श्री पडघन सर, श्री गावंडे बाबूजी, श्री धबाले सर, शिरफुले सर, श्री नरवाडे सर जगन्नाथ कदम सर, श्री गावंडे सर, श्री संतोष माने सर, श्री.कांबळे,व इतर सर्व कर्मचारी यांचे सहकार्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला