सामाजिक

सिया इंटरप्राईजेस नांदेड तर्फे जिजाऊ भवन उमरखेडला रंगरंगोटी

चौकट: शिरीष शिंन्दे यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ केले समाजकार्य


शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192


उमरखेड : आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागते या उदात्त हेतूने युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना करून उमरखेड तालुक्यामध्ये समाजाचे एक भव्य दिव्य भवन उभे राहावं यासाठी उमरखेड तालुक्यातील मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन जिजाऊ सांस्कृतिक भवन उभे केले. बहुजन समाजातील सर्व स्तरातील लोकांना कमी पैशात कार्यक्रम करण्यासाठी उभारलेल्या मंगल कार्यालयास चितांगराव कदम यांनी दहा हजार स्क्वेअर फुट प्लॉट मराठा सेवा संघाला दान देऊन,विविध निधीतून व समाजाच्या देणगीतून उभारलेल्या जिजाऊ सांस्कृतिक भवनाला नांदेड येथील उद्योजक सिया इंटरप्राईजेस चे संचालक शिशिर शिंदे रा. धनेगाव जिल्हा नांदेड यांनी स्व. सुवर्णमाला नवनाथराव शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भवनाला संपूर्ण कलर करण्याचा संकल्प करून जवळपास पूर्ण रंग शनिवारला मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती सुपुर्द केला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कदम, जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, जिल्हा समन्वयक वसंतराव देशमुख, तालुका अध्यक्ष शिवाजी वानखेडे ,तालुका उपाध्यक्ष प्रमोद देशमुख माजी पंचायत समिती सदस्य तथा जिजाऊ ब्रिगेडच्या संगीताताई वानखेडे अमोल चव्हाण ,राम कदम यांच्या उपस्थितीत २० बकेट कलर आणुन भवनाला रंग देण्याच काम युद्धपातळीवर सुरु केले. जवळपास 3हजार स्केअर फुट असलेल्या या बांधकामाला संपुर्ण कलर करण्याची जबाबदारी सिया इंटरप्राईजेस नांदेडचे संचालक शिरीष शिंदे यांनी घेतल्यामुळे समाजातून त्यांचं कौतुक होत आहे अशाच प्रकारच्या उद्योजकांनी समाजासमोर आदर्श ठेवून कार्य करण्याची गरज आहे
__&&
सोबत फोटो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!